शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खनिज वाहतूकदार गीतेश नाईक गजाआड

By admin | Updated: July 14, 2017 02:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : बेकायदा खाण प्रकरणात गीतेश नाईक या वाहतूकदाराला एसआयटीने अटक केली. जितेंद्र देशप्रभू यांच्या भाईडवाडा-कोरगाव येथील

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : बेकायदा खाण प्रकरणात गीतेश नाईक या वाहतूकदाराला एसआयटीने अटक केली. जितेंद्र देशप्रभू यांच्या भाईडवाडा-कोरगाव येथील खाणीवरून बेकायदेशीरपणे खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. देशप्रभू यांच्यावर या प्रकरणात याअगोदरच गुन्हा दाखल झाला आहे.खाण घोटाळा प्रकरणातील अटकसत्र सुरूच असून कांचा गवंडर व फिलीप जॅकोब यांच्यानंतर आता ढवळी-फोंडा येथील गीतेश नाईक याला एसआयटीने अटक केली. भाईडवाडा-कोरगाव येथील जितेंद्र देशप्रभू यांच्या बेकायदेशीर खाणीच्या प्रकरणातील चौकशीदरम्यान ज्या साक्षीदारांकडून साक्षी देण्यात आल्या, त्यात गीतेश नाईक याचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याची माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली.देशप्रभू व गीतेश नाईक या दोघांनी मिळून बेकायदेशीर खनिजाचे उत्खनन आणि नंतर वाहतूक केल्याचे चौकशीत आढळले आहे. सरकारचा ५० कोटी रुपये महसूल बुडविल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. या प्रकरणात काशिनाथ शेट्ये यांनी केलेल्या तक्रारीनंतर देशप्रभू यांना अटकही करण्यात आली होती. त्यावेळी गीतेश यालाही अटक झाली होती. नंतर खाण खात्याने तक्रार केल्यानंतर एसआयटीने गुन्हा नोंदविला होता.गीतेश नाईक तपासाला सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याची कोठडीतील चौकशी अनिवार्य असल्याचा दावा करून एसआयटीने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.