शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईच्या सुनावण्यांवर कोट्यवधींचा निष्फळ खर्च

By admin | Updated: July 21, 2016 02:23 IST

पणजी : म्हादईप्रश्नी सरकार न्यायालयीन लढाई लढत असले तरी या प्रश्नावर आतापर्यंत जे कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत

पणजी : म्हादईप्रश्नी सरकार न्यायालयीन लढाई लढत असले तरी या प्रश्नावर आतापर्यंत जे कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर यांनी केला. म्हादईप्रश्नी युक्तिवाद करणारे माजी अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी आणि अन्य वकिलांवर सरकारने आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले. या प्रश्नावर २00७ सालापासून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहेत. या काळात एकूण २८ सुनावण्या झाल्या. या दरम्यान १0 लाख ८९ हजार रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर २0१२ ते २0१५ पर्यंत २२ सुनावण्या झाल्या. या सुनावण्यांदरम्यान सरकारने २ कोटी ११ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च केला. यात नाडकर्णी यांच्यावर ८६ लाख ८९ हजार रुपये खर्च केले आहेत. या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असून म्हादईप्रश्नी सरकार केवळ उधळपट्टी करत आहे, असा दावा ताम्हणकर यांनी केला. २0 आॅक्टोबर २0१३ ते २४ आॅक्टोबर २0१३ या पाच दिवसांसाठी पी.एस. नरसिंहा यांच्यावर ६ लाख ६0 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्यासमवेत जाणाऱ्या त्यांचे असिस्टंट इत्यादींच्या खर्चाची वेगळी रक्कम नमूद करण्यात आली आहे. काँग्रेस सत्तेवर असताना तेव्हाचे अ‍ॅडव्होकेट जनरल कंटक यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या खर्चात भ्रष्टाचार असल्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर विधानसभेत ओरडून सांगत असत. मात्र, आता भाजपच्या काळात लाखोंनी रुपयांची उधळपट्टी चालली असताना पर्रीकर मूग गिळून गप्प का बसले आहेत, असा प्रश्न ताम्हणकर यांनी केला आहे. जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी या प्रकरणात नैतिक जबाबदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा मांद्रेकर यांनी स्वत: पदाचा राजीनामा द्यावा किंवा म्हादई प्रकरण हाताळण्यास अपयशी ठरलेले मांद्रेकर यांच्याकडून सरकारने राजीनाम्याची मागणी करावी, अशी मागणीही ताम्हणकर यांनी केली. (प्रतिनिधी)