पणजी : यंदा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माईक पांडे व सतीश कौशिक मास्टर क्लास घेणार आहेत. २२ रोजी कला अकादमीच्या कृष्णकक्षात कौशिक एकदिवसीय, तर २४ व २५ नोव्हेंबर रोजी माईक पांडे मास्टर क्लास घेतील. राज्यातील युवा पिढीला चित्रपट क्षेत्रात चांगला करिअर घडवायचा असल्यास इफ्फीदरम्यान होणारे मास्टर क्लास उपयुक्त ठरतात. इफ्फीमध्ये विविध कॉलेज विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. माईक पांडे आधुनिक संगीत आणि तांत्रिक बाजूबाबत मास्टर क्लासद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. कौशिक हे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार असल्याने चित्रपटांशी संबंधित विविध मार्गदर्शन करणार आहेत. कौशिक यांनी ‘राम लखन’, ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटांसह, तर ‘मि. इंडिया’ मधील ‘कॅलेंडर’ सारखे पात्र प्रेक्षकांच्या विशिष्ट लक्षात राहण्यासारखे रंगविले होते. यंदाच्या इफ्फीला कौशिक यांचे मार्गदर्शन मास्टर क्लासद्वारे लाभणार आहे. चित्रपट क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळविण्यासाठी ‘मास्टर क्लास’द्वारे शिक्षण घेणे आवश्यक आहे. इफ्फीत बरेच स्थानिक विद्यार्थी प्रतिनिधी बनून आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि देशी चित्रपटांतील कथा, दिग्दर्शन, संगीत, म्युझिक याचा अभ्यास करण्यासाठी चित्रपट पाहतात. ‘इफ्फी’मुळे युवक-युवतींना चित्रपट क्षेत्रात करिअर घडविण्यासाठीचे आवश्यक ज्ञान मिळते. त्यामुळे यंदाही इफ्फीत मास्टर क्लास, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. गतवर्षी मास्टर क्लासला विद्यार्थ्यांबरोबरच इतर प्रतिनिधींनीही चांगला प्रतिसाद दिला होती. रेसुल पुकुट्टी यांच्या मास्टर क्लासलाही उत्कृष्ट प्रतिसाद लाभलेला. मास्टर क्लास हे या महोत्सवातील एक खास आकर्षण असते. चित्रपट कसे तयार करावेत, छायाचित्रणाचे विविध प्रकार, चित्रपट एडिटिंग, क्रीन टेस्ट, आधुनिक म्युझिक तंत्र इत्यादी माहिती मास्टर क्लासद्वारे देण्यात येते. (प्रतिनिधी)
माईक पांडे, सतीश कौशिक यांचे यंदा मास्टर क्लास
By admin | Updated: November 9, 2014 03:17 IST