वास्को: कारवार, कर्नाटक येथून विक्रमादित्य या नौदलाच्या जहाजावरून प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतलेल्या ‘मीग २९के’ लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी (दि.२३) सकाळी १०.३० वाजता गोव्यातील खोल समुद्रात कोसळले. विमानात तांत्रिक बिघाड होऊन ते समुद्रात कोसळणार असल्याची वैमानिकाला वेळेवरच जाणीव झाल्याने त्यांने पॅराशूटची मदत घेऊन विमानातून उडी घेतल्याने या दुर्घटनेतून तो सुखरूप बचावला. सदर दुर्घटनेतून बचावलेल्या वैमानिकाची प्रकृती सुखरूप असल्याची माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी मिहूल कार्निक यांच्याकडून प्राप्त झाली आहे.रविवारी सकाळी १०.३०च्या सुमारास सदर घटना घडली. कारवार येथून नौदलाच्या ‘मीग २९के’ लढाऊ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ते गोव्याच्या क्षेत्रात असताना अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाला जाणवले. घटना घडण्यापूर्वी विमान गोव्यातील समुद्राच्या वरून उड्डाण घेत असून, तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळणार असल्याची जाणीव वैमानिकाला झाल्याने त्यांने त्वरित विमानातून उडी घेतली. यानंतर सदर विमान गोव्याच्या समुद्रात कोसळले.
गोव्याच्या समुद्रात कोसळले नौदलाचे ‘मीग २९के’ लढाऊ विमान, दुर्घटनेतून वैमानिक सुखरुप बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 15:43 IST
तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळणार असल्याची जाणीव वैमानिकाला झाल्याने त्यांने त्वरित विमानातून उडी घेतली. यानंतर सदर विमान गोव्याच्या समुद्रात कोसळले.
गोव्याच्या समुद्रात कोसळले नौदलाचे ‘मीग २९के’ लढाऊ विमान, दुर्घटनेतून वैमानिक सुखरुप बचावला
ठळक मुद्देप्रशिक्षणासाठी उड्डाण घेतलेल्या ‘मीग २९के’ लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी (दि.२३) सकाळी १०.३० वाजता गोव्यातील खोल समुद्रात कोसळले.विमानात तांत्रिक बिघाड होऊन ते समुद्रात कोसळणार असल्याची वैमानिकाला वेळेवरच जाणीव झाल्याने त्यांने पॅराशूटची मदत घेऊन विमानातून उडी घेतल्याने या दुर्घटनेतून तो सुखरूप बचावला. सदर दुर्घटनेतून बचावलेल्या वैमानिकाची प्रकृती सुखरूप असल्याची माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी मिहूल कार्निक यांच्याकडून प्राप्त झाली आहे.