शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राज्याची मध्यावधी निवडणुकांच्या दिशेने वाटचाल : मायकल लोबो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 14:07 IST

मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलातून डावलण्यात आलेले उपसभापती मायकल लोबो यांनी अप्रत्यक्षपणे नोकरभरतीवरून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला.

म्हापसा - मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलातून डावलण्यात आलेले उपसभापती मायकल लोबो यांनी अप्रत्यक्षपणे नोकरभरतीवरून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला. गोवेकरांनी उठाव करण्याची गरज व्यक्त केली. तसेच राज्याची वाटचाल मध्यावधी  निवडणुकीच्या दिशेने असल्याचे सांगितले. कळंगुट मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले लोबो हे पर्रीकरांचे निकटवर्तीय मानले जातात. साधन सुविधा उपलब्ध करणे म्हणजे विकास नसून लोकांच्या मागण्या पूर्ण करणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे याचाही अर्थ विकास असल्याचे लोबो म्हणाले. 

काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलानंतर लोबो यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा होती; पण त्यांना डावलण्यात आल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला. ते  विदेशात असताना हा फेरबदल करण्यात आला होता. स्थान न मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्यास लोबो यांनी नकार दिला असला तरी नोकरभरतीवरून मात्र सरकारला टार्गेट केले. 

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ऑक्टोबर २०१६ साली सरकारी नोकरभरती स्थगित ठेवली. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी भरती करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा त्याची पूर्तता होत नसल्याचे लोबो म्हणाले.सध्या सुमारे ३ हजार जागा रिक्त असून मायनिंग व्यवसाय बंद झाल्याने लोकांची अस्वस्थता वाढल्याचे त्यांनी सांगितले. सदर फाईल्स मुख्यमंत्री घेऊन बसले असून बेरोजगारी वाढल्याने युवक व्यसनाधीन होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. युती सरकारातील घटक पक्षांनी सरकारला या मुद्यावर जाब विचारण्याची मागणी केली.  तसेच परिस्थिती पाहता राज्याची वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने असल्याचे लोबो म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर