शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

'विलीनीकरणात अस्तित्व नष्ट होते, पण माझ्याकडे सर्व पर्याय!': विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:10 IST

मी कोणतीही परिस्थिती समजून घेण्यास आणि स्वीकारण्यास तयार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवे, हे माझे म्हणणे कायम आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधींशी बोलणी झाल्यानंतरच मी काँग्रेसकडे युती केली व ती कायम ठेवली आहे, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना गोवा फॉरवर्ड काँग्रेसमध्ये विलीन करून स्थानिक पातळीवर तुम्ही नेतृत्व स्वीकारणार का?, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, काँग्रेसबद्दल आपुलकी असलेल्या जुन्या पिढीच्या या भावना आहेत. मी दूरदृष्टीने पुढे जात आहे. म्हणून कदाचित लोकांच्या या भावना असाव्यात. विलीनीकरणात वगैरे अस्तित्वही नष्ट होते. मी कोणतीही परिस्थिती समजून घेण्यास आणि स्वीकारण्यास तयार आहे.

काँग्रेसवर तुमचा विश्वास आहे का?, या प्रश्नावर सरदेसाई म्हणाले की, एकेकाळी ऐनवेळी काँग्रेसने मला तिकीट डावलले; परंतु लोक माझ्‌यासोबत होते म्हणून मी आमदार बनू शकलो, फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणूकपूर्व युती मी राहुल गांधी यांना भेटून बोलणी झाल्यानंतरच केली होती. माझा शब्द पाळला आहे.

मडगाव मतदारसंघात एन्ट्री

मडगाव पालिका निवडणुकीत ११ प्रभागांमध्ये व कुडतरीतील ३ प्रभागांत माझे उमेदवार रिंगणात उतरवणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. विधानसभेसाठी दिगंबर कामत यांच्या मडगाव मतदारसंघात गोवा फॉरवर्डचा हा प्रवेश मानावा का? असे विचारले असता 'निश्चितच होय', असे उत्तर सरदेसाई यांनी दिले. ते म्हणाले की, माझे फातोर्डा मॉडेल यशस्वी झाले आहे. २५ सदस्यीय मडगाव पालिकेत बहुमतासाठी १३ नगरसेवक निवडून यावे लागतील. त्यामुळे मडगाव मतदारसंघातील प्रभागांमध्ये मला उमेदवार द्यावेच लागतील व ते मी देणारच आहे. मडगाव पालिकेत काँग्रेसचे काहीच अस्तित्व नसल्याचा दावा त्यांनी केला. केवळ मडगावमध्येच नव्हे, तर पुढे म्हापसा, तसेच अन्य पालिकांमध्येही गोवा फॉरवर्ड समविचारी लोकांशी बोलून पॅनल उभे करील.

उत्तरेत काँग्रेसला जिंकायचेच नव्हते

गत विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आणि भाजपला संधी मिळाली. या निवडणुकीतून विरोधकांना धडा मिळाला. लोकसभेवेळी दक्षिण गोव्याची जागा इंडिया आघाडीच्या उमेदवाराने जिंकली. उत्तर गोव्यात काँग्रेसला जिंकायचेच नव्हते, असे एकूण चित्र होते. उत्तरेत काँग्रेस अस्तित्वात तरी आहे का?, असा सवाल सरदेसाई यांनी केला.

आरजीला चूक कळेल

सरदेसाई एका प्रश्नावर म्हणाले की, आरजीने 'एकला चलो रे'चे धोरण अंगीकारले असले तरी 'एक ना, एक दिवस' या पक्षाच्या नेत्यांना आपली चूक कळून येईल. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर करून क्रांती घडवायची असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण