शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

मुंबईतील पर्यटकांवर मेरशीत भ्याड हल्ला

By admin | Updated: June 15, 2017 02:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : सुट्टी घालविण्यासाठी गोव्यात आलेल्या वसई-मुंबईतील ५० पर्यटकांना गोव्याची सहल दहशतवादाच्या अनुभवाची ठरली.

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : सुट्टी घालविण्यासाठी गोव्यात आलेल्या वसई-मुंबईतील ५० पर्यटकांना गोव्याची सहल दहशतवादाच्या अनुभवाची ठरली. मेरशी येथील चार गुंडांनी सुरे, कोयते आणि तलवारी घेऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढविला. या हल्ल्यात १४ जण जखमी झाले तर त्यांच्या बसची मोडतोड करण्यात आली. या घटनेमुळे गोव्याची देशात बदनामी झाली. ही घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मेरशी येथील कदंब गेस्टहाउसजवळून सुटलेली पर्यटकांची बस (एमएच -०४- जी- ९४५०) विरुद्ध दिशेने येत विशाल गोलतकर, लॉरेन्स डायस, सूरज शेट्ये ऊर्फ बाबू आणि साई कुंडईकर या चौघा गुंडांनी रोखली. हातात लाठ्याकाठ्या व इतर शस्त्रे घेऊन ते आले होते. बसच्या काचा ते सपासप फोडू लागले. पैकी एक ड्रायव्हरसीटजवळ गेला आणि बसची चावी काढून घेतली तसेच चालकाला ओढून रस्त्यावर पाडले. चौघे मिळून त्याला लाठ्यांनी आणि लाथांनी त्याला मारत असताना बसमधील लोकांनी उतरून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते गुंड तेथून गेले व लवकरच कोयता, तलवारी, सुरा वगैरे घेऊन परतले आणि चालकाला वाचविण्यासाठी खाली उतरलेल्या लोकांवर प्राणघातक हल्ला चढविला, त्यात १४ जण जखमी झाले. येथे जवळच दवाखाना असलेले डॉ. वासुदेव पै यांनी हल्ल्यातील जखमीवर प्रथमोपचार केले.तलवारीचा तिरपा वारमारहाण सुरू असलेल्या बसचालकाला वाचविण्यासाठी बसमधील माणसे पुढे सरसावली त्यात एक महिलाही होती. तलवारी व कोयते घेऊन आलेल्या गुंडांनी तिच्यावरही तलवारीचा वार केला; परंतु तो वार सरळ न जाता तिरपा गेला तो तिच्या हाताचे खालीपासून वरपर्यंत मांस कापून गेला. रक्तबंबाळ स्थितीत तिला इस्पितळात दाखल करण्यात आले. अमोल घोडकर याला लाठ्यांनी मारहाण केल्यामुळे त्याच्या खांद्याला जबर जखम झाली आहे. रस्त्यावर आपटून मारहाण करण्यात आलेल्या चालक शिवाजी याचा पाय मोडला. सुस्त पोलीस, बघे लोकगुंड या पर्यटकांना मारत असताना आजूबाजूचे लोक पाहात होते; परंतु त्यांना रोखण्याचे धाडस कुणीच करीत नव्हते. तसेच जुने गोवा येथून पोलिसांना येण्यासाठीही बराच विलंब लागला. शेवटी आपल्या माणसांना मारताहेत ते सहन न होऊन बसमधीलच महिला व इतर लोक खाली उतरले आणि त्यांनी हल्लेखोरांवर हल्ला चढवून त्यांना पकडून ठेवले. पोलीस पोहोचल्यावर तिघांना पोलिसांच्या तावडीत त्यांनी दिले. चौथा मात्र निसटला. हल्लेखोर गुंडचचार हल्लेखोरांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून चौथा साई कुंडईकर हा तेथून तलवारी वगैरे घेऊन पळून गेला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांचीही पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. संशयित विशाल गोलतकर (३०) आणि सूरज शेट्ये ऊर्फ बाबू हे दोघेही पर्वरीतील काही गुन्ह्यांत अडकलेले आहेत. संशयित लॉरेन्स डायसवर पणजी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा कलम १७८/२०१६, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न करणे आणि कटकारस्थान करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे.