शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

खाण अवलंबिता बरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेली बैठक फार्सच; काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 20:06 IST

खाणी सुरु करण्यास होणाऱ्या विलंबाबाबत मुख्यमंत्री केवळ कारणेच देत आहे.

मडगाव:  खाण अवलंबितांसोबत डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेली बैठक म्हणजे खाण उद्योग सुरु करण्यासाठी आणखी मुदत मागून घेण्यासाठीचा फार्स होता, अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 

खाणी सुरु करण्यास होणाऱ्या विलंबाबाबत मुख्यमंत्री केवळ कारणेच देत आहे. खाणी सुरु करण्याचा सरकारचा उद्देशच नसल्याने शुक्रवारी खाण अवलंबितांसोबतच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, असे मत चोडणकर यांनी व्यक्त केले. बहुचर्चित दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सोबत झालेल्या बैठकीच्या संदर्भातील वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांना सोयीस्कर विसर पडला असे त्यांनी सांगितले. 

खाण पट्ट्यातील जनतेची आर्थिक स्थिती सुधारावी असे वाटत नसल्यानेच भाजपला खाणी सुरु करण्याची इच्छाशक्तीच नाही असे मुख्यमंत्र्यांनी कबूल करावे. लोकांना गरीब ठेवून निवडणुकीच्या वेळी त्यांचा वापर करावा अशी भाजपची रणनिती आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला. तथापि, खाण अवलंबितांमध्ये भाजपच्या विरोधात असंतोष खदखदत असून   भाजपचा हा डाव यशस्वी होणार नाही, असे भाष्य चोडणकर यांनी केले.  

2012 पासून या विषयावर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्र्यांसोबत  बैठकांमागून बैठका घेण्याचा फार्स करण्यात येत आहे. त्या एेवजी खाणी सुरु करण्याचा निश्चित आराखडा भाजप प्रणित सरकारने जाहीर करावा अशी मागणी चोडणकर यांनी केली. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना खाणी सुरु करण्याबाबत कोणती अडचण आहे, असा सवाल त्यांनी केला. 

ट्रक मालकांनी खनिज वाहतुकीसाठी योग्य दर मिळावा यासाठी केलेल्या मागणीकडे सरकारने काणाडोळा केला, अशी टिकाही त्यांनी केली.  ट्रक मालकांना योग्य आर्थिक मदत न करता खनिज वाहतूक सुरु करणे निरर्थक आहे. खनिज वाहतुकीतील भाजपच्या दलालांना बाजुला सारून स्थानिकांना न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. आणखी विलंब न करता खाण व्यवसाय सुरु करण्याची तारीख सरकारने निश्चित करावी, अन्यथा हे सरकार खाण व्यवसाय सुरु करू शकत नाही, असे जाहीर करावे अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतcongressकाँग्रेस