शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Goa: खाणी सुरू करण्याआधी सुप्रीम कोर्टात मान्य केलेल्या ३९ अटींची पूर्तता करा, गोवा फाउंडेशनचा इशारा

By किशोर कुबल | Updated: December 11, 2023 14:00 IST

Goa News: राज्यात खाण व्यवसाय सुरु करण्याआधी सर्वोच्च न्यायालयात मान्य केलेल्या अटींची पुर्तता करा, अशी मागणी करणारे पत्र गोवा फाउंडेशनने खाण खात्याला लिहिले आहे.

- किशोर कुबल पणजी - राज्यात खाण व्यवसाय सुरु करण्याआधी सर्वोच्च न्यायालयात मान्य केलेल्या अटींची पुर्तता करा, अशी मागणी करणारे पत्र गोवा फाउंडेशनने खाण खात्याला लिहिले आहे. या अटींची पूर्तता न केल्यास न्यायालयात आव्हान देण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, यापूर्वी अनिर्बंधित खाण व्यवसायामुळे निर्माण झालेले सामाजिक तसेच पर्यावरणीय प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सरकारने घेतली होती परंतु परिस्थिती अजुनही तशीच आहे.

१० फेब्रुवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करुन शपथेवर या अटी पाळण्याचे आश्वासन दिले होते व या आश्वासनाच्या आधारवरच काही याचिका न्यायालयाने निकालात काढल्या होत्या. परंतु या अटींची पुर्तता करणे सोडाच, पण त्यादृष्टीने कामही सुरु केलेले नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेचे असे म्हणणे आहे की, ‘ ४० प्रकरणांमध्ये अवैध खाण व्यवसायासंबंधी कडक कारवाईचे आश्वासन दिले होते. परंतु आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार एकाही प्रकरणात कारवाई झालेली नाही.

२०१३ साली दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने एसआयटीने खाण गैरव्यवहारांची चौकशी सुरु केली परंतु अजूनही समाधानकारक तपास झालेला नाही. एसआयटी निष्क्रीय बनलेली झालेली आहे. ज्या बोलिधारकांच्या विरोधात तपास सुरु आहे त्यांना नव्या लिलांव प्रक्रियेत बोली लावू दिली. खाण रॉयल्टीच्या (स्वामित्त्वधन) ६० टक्के निधी खनिजाच्या सुरक्षित व त्रासमुक्त वाहतुकीसाठी कॉरीडोअर बांधण्याकरिता वापरण्यात येईल, असे  मान्य केले होते परंतु त्याची पूर्तता केलली नाही. २००२ ते २०१२ या दहा वर्षातील काळातील बेकायदा खाण व्यवसायाची सीबीआय किंवा लोकायुक्तांव्दारे चौकशी करण्याचे आश्वासन दिले सरकारने दिले होते तेही पाळलेले नाही.

 ...तर कोर्टात आव्हान देऊ - क्लॉड आल्वारिसदरम्यान, गोवा फाउंडेशनचे संस्थापक क्लॉड आल्वारिस यांनी असे म्हटले आहे की, जर सरकारने या ३९ अटींची पूर्तता केली नाही व पूर्वीप्रमाणेच कुठल्याही नियमांचे पालन न करता अनिर्बंध खाण व्यवसाय चालू केला तर कायद्याने आम्ही त्याला आव्हान देऊ.’

टॅग्स :goaगोवा