शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

अपघात रोखण्यासाठी न्हयबाग जंक्शनवर अखेर उपाययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2024 16:12 IST

जंक्शनवर २४ तास वाहतूक पोलिस तैनात करण्याची सूचनाही करण्यात आली होती.

पेडणे : राष्ट्रीय महामार्गावर पोरस्कडे-धारगळ रस्त्यावरील न्हयबाग जंक्शनवर ब्लिंकर सिग्नल बसवण्यास अखेर बुधवारी सुरुवात झाली. या ठिकाणी सातत्याने झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मदार आमदार प्रवीण आर्लेकर यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि स्थानिक पंचायत मंडळाच्या उपस्थितीत जंक्शनची २० फेब्रुवारी रोजी पाहणी केली होती. अधिकाऱ्यांनी तातडीने या जंक्शनवर सिग्नल बसवावेत अशा सूचना आमदारांनी केल्या होत्या. याशिवाय, जंक्शनवर २४ तास वाहतूक पोलिस तैनात करण्याची सूचनाही करण्यात आली होती.

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या पाहणीनंतर पत्रकारांना सांगितले होते की, सिग्नलविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सिग्नल बसवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार या ठिकाणी सिग्नल बसवण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींसह समस्या सोडविण्यासाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी साथ द्यावी असे आवाहन पेडणे तालुका विकास समितीचे निमंत्रक व्यंकटेश नाईक यांनी केले. पोरस्कडे पंचायतीसमोरून ते न्हयबाग-भटपावणीपर्यंत उड्डाणपूल उभारणे हाच एकमेव उपाय आहे. पोरस्कडे-अमेरे-न्हयबाग पंचायतीने ग्रामसभेत असा ठराव मंजूर करून सरकारकडे पाठपुरावा करावा, असे मत नाईक यांनी व्यक्त केले. 

जनतेचा रोष

राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम पत्रादेवी ते धारगळ-महाखाजनपर्यंत एमव्हीआर कंपनी करत आहे. परंतु जमीन संपादनास विलंब लागला. त्यामुळे सर्व्हिस रोड करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याचे दिसते. सरकारने गावागावांना जोडणारे सर्व्हिस रोड, बगल रस्ते आणि त्यासाठी लागणारी जमीन अगोदर संपादित करणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने कंत्राटदार, अभियंत्यांना जनतेचा रोष पत्करावा लागत आहे.

टॅग्स :goaगोवाroad transportरस्ते वाहतूक