शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पालिकांसाठी मास्टर प्लॅन

By admin | Updated: September 19, 2015 02:03 IST

पणजी : पालिका निवडणूक झाल्यानंतर पहिल्या महिनाभरात तीन गोष्टींचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. प्रत्येक पालिकेसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी

पणजी : पालिका निवडणूक झाल्यानंतर पहिल्या महिनाभरात तीन गोष्टींचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. प्रत्येक पालिकेसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी नवनिर्वाचित पालिका मंडळावर असेल, तसेच नागरिकांची देखरेख समिती स्थापन करावी लागेल. निवडून येणाऱ्या प्रत्येक नगरसेवकाला मुंबई येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्थेत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईल. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी नगरनियोजन खात्याचे मंत्री या नात्याने ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, पालिकांनी शहरात काय हवे, याबाबत गरजा ओळखून मास्टर प्लॅन तयार करायला हवा. पंचायतींमध्ये ग्रामसभांमधून अनेक विषय येत असतात; परंतु पालिकांमध्ये अशी व्यवस्था नसल्याने नागरिकांचे म्हणणे पुढे येतच नाही. शहराच्या गरजा काय किंवा कोणकोणती विकासकामे व्हायला हवीत आणि त्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे पालिका मंडळांना नागरिकांकडून समजू शकत नाही. त्यामुळे नागरिकांचा समावेश असलेली देखरेख समिती स्थापन करणे आवश्यक आहे. नगरसेवकांना आपल्या जबाबदाऱ्या तसेच अधिकार यांची जाणीव व्हावी, त्यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. अनेकदा अनभिज्ञता असल्याने नगरसेवकांकडून अपेक्षेप्रमाणे काम दिसत नाही आणि त्याचा परिणाम विकासावर होतो. नवनिर्वाचितांना प्रशिक्षण चुकविण्यासाठी कारणे देता येणार नाहीत. त्यांचा प्रवास खर्च तसेच निवास व इतर खर्चही सरकार करणार आहे. पालिका कचरामुक्त व्हाव्यात यासाठी स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. फोंडा व साखळी वगळता म्हापसा, मडगाव, कुडचडे, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, मुरगाव, पेडणे, वाळपई, डिचोली आणि सांगे या ११ पालिकांसाठी २५ आॅक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी प्रक्रिया ३0 पासून सुरू होत आहे. मतमोजणी २७ आॅक्टोबर रोजी होईल. निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली तरी प्रभागांची राखीवता अजून निश्चित झालेली नाही. ओबीसी, महिला, अनुसूचित जमाती, मागास यांच्यासाठी राखीवतेची अधिसूचना अजून काढलेली नाही. या निवडणुकीत ओबीसींची राखीवता १९.५ टक्क्यांवरून २७ टक्क्यांपर्यंत वाढविली आहे. मडगाव, म्हापसा व मुरगाव पालिकेत लोकसंख्येनुसार प्रभागसंख्या वाढवली आहे. (प्रतिनिधी)