शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मडगाव पालिका राजकारण: विजयची गर्जना; सर्व प्रभागात गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार देण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:33 IST

वजाबाकीचे गणित कायम; शहरात चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: फातोर्डा मतदारसंघाचे आमदार, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत मडगाव, फातोर्डा व कुडतरी मतदारसंघातील प्रभागातून आपले उमेदवार उभे करणार असल्याचे आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जाहीर केले आहे.

विजय सरदेसाई यांनी केलेल्या विधानावरून सध्या शहरात चर्चेला सुरुवात झाली आहे. विजय यांनी ही गर्जना केली, परंतु उमेदवारांच्या वजाबाकीचे गणित मात्र कायम आहे. सरदेसाई यांनी गत निवडणूक काँग्रेससोबत लढवली होती. आगामी निवडणूकही समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढवली तर ते कोणते प्रभाग सोडतील, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०२१ रोजी पालिका निवडणुकीवेळी गोवा फॉरवर्ड व काँग्रेस पक्षाच्या वतीने मडगाव मॉडेल पॅनल घडवून फातोर्डा फॉरवर्डचा नगराध्यक्ष केला. त्यानंतर मडगावचे दिगंबर कामत आमदार दिगंबर कामत यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे सरदेसाई यांनी आपल्या गटातून नगराध्यक्षपदासाठी घनश्याम शिरोडकर यांना, तर भाजपच्याकडून कामत यांचे कट्टर समर्थक दामोदर शिरोडकर यांना उमेदवारी अर्ज दिला.

त्यावेळी झालेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत नगराध्यक्षपदी घनश्याम शिरोडकर निवडून आले. परंतु, हा निकाल अमान्य करत कामत गटाकडून त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला व पुन्हा निवडणूक घेण्यात आली. हात उंचावून मतदान घेण्याचा ठराव विधानसभेत कामत यांनी मंजूर करून घेतला. त्यानुसार झालेल्या मतदान प्रक्रियेत नगराध्यक्षपदी दामोदर शिरोडकर यांची निवड झाली. घनश्याम शिरोडकर केवळ १० दिवसच नगराध्यक्षपदी राहिले.

कोणाकडे किती नगरसेवक

सध्या मडगाव पालिकेची सत्ता आमदार कामत गटाकडे म्हणजेच भाजपकडे आहे. कामत यांचे समर्थन लाभलेले नगराध्यक्ष शिरोडकर पालिकेचा कार्यकाळ संपेपर्यंत तरी खुर्चीवर विराजमान राहतील यात दुमत नाही. कारण पालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काहीच महिने शिल्लक आहेत. सध्या पालिकेत गोवा फॉरवर्डकडे ७, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांचे समर्थन लाभलेले ५, आमदार कामत गटाकडे ११, तर २ अपक्ष नगरसेवक आहेत. मडगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या १६ प्रभागातील नगरसेवक सत्ताधारी भाजपचे आहेत. कुडतरी मतदारसंघात तीन नगरसेवक येतात. पैकी २ नगरसेवकांना निवडणुकीवेळी दामोदर नाईक यांचे समर्थन लाभले होते.

'कुंकळ्ळी, कुडचडे पालिकेवरही सत्ता आणू'

पुढील नगराध्यक्ष गोवा फॉरवर्ड पक्षाचा असेल, असा दावा गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणिस मोहनदास लोलयेकर यांनी केला आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीत मडगाव, फातोर्डा व कुडतरी या मडगाव पालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व प्रभागात गोवा फॉरवर्ड पक्षाचा उमेदवार उभा केला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा पराभव हे एकमेव ध्येय गोवा फॉरवर्डचे असेल. केवळ मडगावच नाहीतर कुंकळ्ळी व कुडचडे पालिकाही गोवा फॉरवर्ड काबीज करणार, असे लोलयेकर यांनी सांगितले.

मडगावात 'फॉरवर्ड'चे कार्य नाही : काकोडकर

मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष अभिषेक काकोडकर यांनी सांगितले, की मडगावात भाजपचे १६ नगरसेवक आहेत. मडगाव पालिकेत भाजपची सत्ता आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे मडगावात तसे फारसे कार्य नाही. मडगाव भाजप मंडळ व मडगावचे आमदार २४ तास काम करतात, हे मडगावकरांना माहीत आहे. जरी गोवा फॉरवर्ड पक्षाने आपले उमेदवार मडगावात उभे केले तरी त्याचा काहीच परिणाम होणार नाही, असे मला वाटते.

आघाडी म्हणून समर्थन देऊ : सावियो कुतिन्हो

काँग्रेस पक्षाचे नेते सावियो कुतिन्हो यांना सांगितले, की निवडणुका जवळ आल्यानंतर उमेदवार आघाडीचे असतील की गोवा फॉरवर्डचे असतील ते समजेल. सध्या त्याविषयी भाष्य करणे चुकीचे ठरेल. जर त्यांनी आघाडीचे उमेदवार म्हणून मडगाव व कुडतरीतील प्रभागात उमेदवार दिले तर आम्ही त्यांना समर्थन देऊ. योग्यवेळी निवडणूक आल्यावर निर्णय घेतला जाईल. जर गोवा फॉरवर्ड काँग्रेस व आघाडीसोबत असेल त्यांना आमचा पाठिंबा असेल. 

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूक 2024Politicsराजकारण