शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मांद्रेतील उमेदवारीचा तिढा कायम, प्रचार मात्र जोमाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 12:39 IST

शिरोडा तसेच मांद्रे मतदारसंघाच्या पोटनिवडणुका लवकरच जाहीर होण्याच्या मार्गावर असल्या तरी उमेदवारीवरुन निर्माण झालेला तिढा अद्यापपर्यंत सुटला नाही. निर्माण झालेल्या तिढ्यामुळे या मतदारसंघातील रंगत वाढत चालली आहे.

म्हापसा : शिरोडा तसेच मांद्रे मतदारसंघाच्या पोटनिवडणुका लवकरच जाहीर होण्याच्या मार्गावर असल्या तरी उमेदवारीवरुन निर्माण झालेला तिढा अद्यापपर्यंत सुटला नाही. निर्माण झालेल्या तिढ्यामुळे या मतदारसंघातील रंगत वाढत चालली आहे. असे असले तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. देवाला साक्षी मानून प्रचार कार्य जोमाने सुरू केले आहे.  

विद्यमान विधानसभेतील काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांनी आमदारकीचे राजीनामे सादर केल्यानंतर रिक्त झालेल्या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणुकांची तारीख कुठल्याही क्षणी जाहीर होणार असले तरी भाजपा आणि काँग्रेस पक्षात उमेदवारीवरुन निर्माण झालेला तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने कायम आहे. 

तिढा कायम असला तरी काँग्रेस पक्षाचा त्याग करुन पुन्हा भाजपावासी झालेले माजी आमदार दयानंद सोपटे यांनी आपल्या प्रचार कार्याला जोमाने सुरुवात केली आहे. आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आपल्या देवतेला साक्षी मानून त्याला नारळ ठेवून प्रचार कार्य सुरू केले आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार आपणच असणार असल्याचे मतदारांना सांगून प्रचार करु लागले आहेत. दुस-या बाजूने माजी मुख्यमंत्री तसेच 2017च्या विधानसभा निवडणुकीत सोपटेंकडून पराभव स्वीकारलेले लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही आपला प्रचार सुरू केला आहे. 

दुस-या बाजूने काँग्रेस पक्षातील उमेदवारी मिळवण्यावर सुद्धा तीन उमेदवारात तिढा निर्माण झालेला आहे. माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले असून माजी शिक्षण मंत्री संगीता परब यांचे पुत्र सचिन परब तसेच पक्षाचे उपाध्यक्ष बाबू बागकर हे सुद्धा उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असल्याने कॉँग्रेस पक्षातील तिढ्याला कारण ठरले आहे. या तिघांनीही आपला प्रचार सुद्धा सुरू केला आहे. या दोन्ही पक्षाला आव्हान देण्यासाठी जीत आरोलकर या अपक्ष उमेदवाराने सुद्धा आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांना मगोपकडून उमेदवारी देण्यावर चर्चाही सध्या सुरू झाली आहे. 

२०१७ साली झालेल्या निवडणुकीवेळी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने भाजपाकडून खेचून आणून विजयश्री मिळवलेला होता. त्यामुळे काँग्रेस हा मतदारसंघ पुन्हा स्वत:कडेच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. मतदारसंघावरील गेलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाणार असून सोपटे यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यास ते सुद्धा आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीला लागले आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे सुद्धा गमावलेले आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या निवडणुकीतून करणार आहेत. सध्या निर्माण झालेला तिडा मांद्रेतील एकूण राजकीय स्थितीत आणखीन रंगत भरू लागला आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर