शहरं
Join us  
Trending Stories
1
राणाला बिर्याणी नको, थेट फाशीच द्या! लोकांचे प्राण वाचवणाऱ्या चहाविक्रेत्यासह अनेकांची मागणी
2
Nagpur: हेल्मेट न घातल्याने हटकले, पोलिसाने तरुणाच्याच लगावली कानशिलात; व्हिडीओ होतोय व्हायरल
3
सातारा हादरले! अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून, शेतात सापडला मृतदेह
4
२०११ पासून PM मोदींच्या 'वॉन्टेड' लिस्टमध्ये होता तहव्वुर राणा; पंतप्रधानांची जुनी पोस्ट व्हायरल
5
"....तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा"; रोहित पवारांची महायुती सरकारकडे मागणी
6
बजाज ऑटोच्या मधुर बजाज यांचं निधन, वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
पाकिस्तान क्रिकेटमध्ये राडा! बाबर आझमनंतर आता मोहम्मद रिझवानही कर्णधारपद सोडणार; कारण काय?
8
मध्यमवर्गीयांनी कसं बनावं श्रीमंत? झिरोदाच्या नितीन कामथ यांनी दिला महत्त्वाचा सल्ला
9
Exclusive: 'छोरी 2'मध्ये पहिल्यांदाच घडतंय असं काही...गश्मीरने साकारली अनोखी भूमिका; म्हणाला...
10
'फुले' सिनेमाची नवी रिलीज डेट आली समोर, करण्यात येणार हे मोठे बदल
11
अक्षर पटेलचा मोठा पराक्रम, अवघ्या ४ सामन्यांतच वीरेंद्र सेहवागचा १६ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला!
12
दागिने गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेणं आता होणार कठीण, RBI का बदलायच्या तयारीत आहे Gold Loan चे नियम?
13
‘थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली, महात्मा फुलेंकडून अनुकरण’ उदयनराजेंचं वक्तव्य
14
जगात सर्वाधिक कचरा कोणता देश करतो? १४३ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचा वाटा किती?
15
गावातल्या महिलेसोबत मुलाचे प्रेमसंबंध; आईने विरोध केला म्हणून लेकाने तिच्याच पदराने तिला संपवलं
16
अमेरिकेच्या टेरिफने चीनचे धाबे दणाणले! भारताकडे डोळे लागले; पण पाकिस्तानी लोक काय बोलतायत?
17
ट्रम्प टॅरिफनंतर चीनचं 'या' क्षेत्रात वर्चस्व कायम! अमेरिकचं तर नावही नाही, भारताचा नंबर घसरला
18
IPL 2025 : थाला is Back! MS धोनी 'मॅजिक' अन् CSK साठी Playoffs जंक्शन गाठण्याचं 'लॉजिक'
19
दिवसाला १० लाख देण्यासाठी तयार होती 'ही' कंपनी; पण विराट बनला नाही ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, कारण काय?
20
Video: 'शतकवीर' प्रियांश आर्यचे 'ते' उत्तर अन् हळूच प्रिती झिंटाच्या गालावर पडली खळी

उद्योगांत रोजगाराच्या अनेक संधी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:36 IST

बॉयलर अटेंडंट अभ्यासक्रमाचा लाभ; औद्योगिक सुरक्षा-आरोग्य परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य सरकारने बॉयलर अटेंडंट अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. युवकांना त्यामुळे नोकऱ्या उपलब्ध होतील. सरकार औद्योगिक सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन या गोष्टींना प्राधान्य देत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

ताळगाव पठरावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर कारखाने आणि बाष्पक खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या उपस्थितीत तीन दिवसांच्या पहिल्या गोवा औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य प्रदर्शन परिषद २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कारखाने आणि बाष्पक खात्याचे सचिव संजीत रॉड्रिग्ज, खात्याचे संचालक अनंत पांगम व गोवा वेदांता कंपनीचे सीईओ नवीन जाजू हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, औद्योगिक अपघात व रस्ता अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी जागृती व प्रत्यक्ष कृती व्हायला हवी. कामगारांच्या सुरक्षेला सरकार प्राधान्य देते. 'स्किल ऑन व्हील' उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात वाहन जाईल व युवकांना औद्योगिक गरजांच्या अनुषंगाने प्रशिक्षित करेल. यासाठी २ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. युवकांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी विविध कार्यक्रम केले. आयटीआय केंद्रांचा दर्जा वाढवला. उद्योग संघटनांबरोबर करार करून आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचे काम केले. फार्मा उद्योग, सेवा व पर्यटन क्षेत्रामध्ये नोकऱ्यांसाठी बराच वाव आहे. यावेळी गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, हरयाना राज्यांतील उद्योजक सहभागी झालेले आहेत.

'स्किल-ऑन-व्हील्स'

ग्रामीण गोव्यात प्रत्यक्ष औद्योगिक सुरक्षा प्रशिक्षण देण्यासाठी दोन कोटी रुपयांचा 'स्किल-ऑन-व्हील्स' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. औद्योगिक, अग्निशमन, विद्युत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण दिले जाईल.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत