शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत, पेंग्वीनकडून घोषणा; एप्रिलमध्ये होणार प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 18:42 IST

र्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत प्रथमच येत आहे. यापूर्वी सदगुरू पाटील यांनी मराठीत गोव्याचे राजकारण व पर्रीकर असा विषय घेऊन पहिले पुस्तक लिहिले होते.

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे चरित्र प्रथमच इंग्रजीत येत आहे. लोकमतच्या गोवा आवृत्तीचे ब्युरो चिफ सदगुरू पाटील व पत्रकार मायाभुषण नागवेकर यांनी मिळून लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन देशात व विदेशातही मोठे नाव असलेल्या पेंग्वीन रेण्डम हाऊस या प्रकाशन संस्थेकडून केले जाणार आहे. पेंग्वीनने सोमवारी त्याविषयीची घोषणा केली.

पर्रीकर यांचा उद्या मंगळवारी पहिला स्मृतीदिन आहे. त्या पाश्र्वभूमीवर पेंग्वीन रेण्डम हाऊसचे पुस्तक एप्रिलमध्ये बाजारात उपलब्ध होत असल्याचे पेंग्वीनच्या प्रकाशक मिली ऐश्वर्या यांनी जाहीर केले. पर्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत प्रथमच येत आहे. यापूर्वी सदगुरू पाटील यांनी मराठीत गोव्याचे राजकारण व पर्रीकर असा विषय घेऊन पहिले पुस्तक लिहिले होते. यावेळी पाटील व श्री. नागवेकर यांनी मिळून पूर्ण नव्या पुस्तकाची निर्मिती पेंग्वीनसाठी केली आहे. पेंग्वीनकडून एबुरी प्रेसतर्फे हे पुस्तक प्रकाशीत केले जाईल.

अॅन एक्स्ट्राऑर्डीनरी लाईफ : अ बायोग्राफी ऑफ पर्रीकर असे पुस्तकाचे नाव आहे. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर लिहिल्या गेलेल्या या पुस्तकात पर्रीकर यांचे बालपण, त्यांचे विद्यार्थी दशेतील काम, आयआयटीतील कामगिरी, मुख्यमंत्री व संरक्षण मंत्री म्हणून कारकिर्द याविषयीची माहिती आहे. विशेष म्हणजे पर्रीकर यांचे मित्र, कुटूंबिय, नातेवाईक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, काही टीकाकार, अभ्यासक यांच्याशी बोलून या पुस्तकात बरीच सचित्र रंजक माहिती समाविष्ट केली गेली आहे. पर्रीकर यांच्या राजकीय कारकिर्दीचे तटस्थ असे रिपोर्ट कार्ड म्हणूनही या पुस्तकाकडे पाहता येईल, असे दोन्ही लेखकांचे म्हणणो आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा