शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रीकर 5 वर्षांनंतर होणार निवृत्त ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 13:50 IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पाच वर्षानंतर निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती पत्करण्याची दाट शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत त्यांनी स्वतः दिलेत.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 29 - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पाच वर्षानंतर निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती पत्करण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी स्वत: तसे स्पष्ट संकेत दिले असून आपण पुढील पाच वर्षानंतर मुख्यमंत्रीपदी असणार नाही, असेही विधान केले आहे. गोव्याच्या आणि देशाच्याही राजकीय क्षेत्रात हा विषय सध्या चर्चेत आहे.
 
पर्रीकर सध्या गोव्यात भाजपाप्रणीत आघाडी सरकारचे नेतृत्त्व करत आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष यांचे आघाडी सरकार चालवण्याची कसरत पर्रीकरांना करावी लागत आहे. या सरकारमध्ये भाजपाचे स्वत:चे केवळ 13 आमदार आहेत. 
 
डिसेंबर 1955 मध्ये जन्मलेले पर्रीकर हे आता 61 वर्षे वयाचे आहेत. कुठल्याही राजकारण्याने 65 ते 70 वर्षे वयोगटामध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्त व्हावे, असे आपले मत असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर  यांनी एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकास दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
 
प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याचा विचार करावा व 65 ते 70 वर्षापर्यंतच निवडणुकीच्या राजकारणात रहावे. उगाच दीर्घकाळ राहण्यात अर्थ नाही, असे पर्रीकर म्हणालेत. गोव्यातील सध्याचे आघाडी सरकार पाच वर्षे टीकेल. मी स्वत: पाच वर्षानंतर मुख्यमंत्रीपदी राहणार नाही, अशीही पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.  
 
जर मी गोव्यात मुख्यमंत्री म्हणून आलो नसतो तर दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून काम सुरू ठेवले असते पण सध्याचा केवळ एकच टर्म मी दिल्लीत राहिलो असतो हे मी अगोदरच स्पष्ट केले होते, असेही पर्रीकर  यांनी सांगितले.
आयआयटी पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता असलेले पर्रीकर हे देशातील पहिले मुख्यमंत्री ठरतात. त्यांच्यानंतर दिल्लीचे अरविंद केजरीवाल हे दुसरे आयआयटी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले मुख्यमंत्री आहेत. (प्रतिनिधी)