शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत असेपर्यंत मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी राहतील - मायकल लोबो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 19:48 IST

मनोहर पर्रीकर जिवंत असेपर्यंत मुख्यमंत्रिपदी राहतील व गोमंतकीयांची सेवा करतील, असे भाजपचे आमदार व उपसभापती मायकल लोबो यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले.

पणजी - मनोहर पर्रीकर यांचा आजारच असा आहे, की ज्यात कधी स्थिती सुधारते तर कधी ढासळत असते. माझ्या वडिलांना देखील पर्रीकरांप्रमाणोच स्वादुपिंडाचाच आजार झाला होता व त्यामुळे मला स्थिती ठाऊक आहे. तथापि, पर्रीकर जिवंत असेपर्यंत मुख्यमंत्रिपदी राहतील व गोमंतकीयांची सेवा करतील, असे भाजपचे आमदार व उपसभापती मायकल लोबो यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले.

पर्रीकर यांना विश्रंती घेणे आवडत नाही. ते जोपर्यंत या जगात जीवंत असतील, तोपर्यंत ते मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडणार नाहीत. ते गोव्यासाठी काम करत राहतील, असे लोबो म्हणाले. पर्रीकर आजारी असले तरी, ते जोपर्यंत सरकार चालवतात, तोपर्यंत भाजपप्रणीत आघाडीची सत्ता अबाधित राहील. जोपर्यंत पर्रीकर यांचे डोके चालते व जोपर्यंत ते अधिका-यांना सूचना करू शकतात, तोपर्यंत सरकारही चालेल. सद्यस्थितीपर्यंत पर्रीकर प्रयत्न करत आहेत. देव आहेच. देवाच्या हातात सर्व काही आहे . विशेषत: पर्रीकरांचे आरोग्य तरी देवाच्या हाती आहे. जर पर्रीकर यांना काही झाले तर मग त्यावेळी काय करावे ते पाहता येईल. माझ्या वडिलांनाही हाच आजार होता. कुणीच हा आजार अंगावर घेऊन कायमस्वरूपी जगू शकत नाही, असे लोबो यांनी नमूद केले. 

मंत्री म्हणतात पर्रीकर थकलेत 

दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दोनापावल येथील आपल्या निवासस्थानी जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक घेतली, तेव्हा काही मंत्र्यांना पर्रीकर थकले आहेत, असे जाणवले. पर्रीकर हे पूर्वीच्या तुलनेत आता थकले आहेत, असे दोघा मंत्र्यांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. आम्ही काही प्रश्न घेऊन गेलो होतो, पण ते विचारण्याचे धाडस झाले नाही, कारण र्पीकर यांची स्थिती वेगळी आहे.  मंत्रिमंडळ बैठकही जास्त वेळ चालली नाही. मंत्रिमंडळासमोरील सर्व विषयांना मंजुरी दिल्यानंतर पर्रीकर यांनी अन्य कोणत्या विषयांबाबत चर्चा केली नाही. आम्हीही त्यांना जास्त काही विचारले नाही. कारण त्यांना विश्रंतीही गरज आहे हे आम्हाला कळतेय. त्यामुळेच त्यांनी मंत्रिमंडळ बैठक सचिवालय किंवा मंत्रलयात न घेता, ती घरीच घेतली.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाPoliticsराजकारण