शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कोणाकडेही सोपवणार नाही मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार, अमेरिकेहून काम करणार- पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 21:11 IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत.

पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. पर्रीकर अमेरिकेला गेल्यामुळे गोव्यात सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे. त्यातच मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार कोणाकडेही सोपवलेलं नाही. तसेच मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता चार्ज कोणाकडेही देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.पर्रीकर म्हणाले, गोव्यासंदर्भातील प्रशासकीय कामं मी अमेरिकेतून करणार आहे. मी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार कोणाकडेही सोपवणार नाही. महत्त्वाची कामं मी अमेरिकेतून करणार असून, माझ्या कर्मचा-याच्या मी ईमेलच्या माध्यमातून संपर्कात आहे. गोवा सरकारमधील सगळेच मंत्री सध्या अस्वस्थ आहेत. राजकीय स्थिती अस्थिरतेची बनू लागली आहे. अगोदरच सरकारमधील दोन मंत्री इस्पितळात आहेत. ते कधी बरे होऊन परत येतील हे कुणाला ठाऊक नाही. त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सुद्धा आजारी आहेत. ते न्यूयॉर्क अमेरिकेमधील स्लोन केटरींग स्मृती इस्पितळातून दुस-यांदा उपचार घेऊन नुकतेच परतले होते. मात्र, त्यांना पुन्हा मुंबईतील लीलावती इस्पितळात दाखल व्हावे लागले. आता मुंबईहून ते पुन्हा अमेरिकेला उपचारांसाठी निघाले.गोव्यात राजकीय गोंधळ; सरकारमध्ये पर्यायी नेतृत्वाची चर्चा, पर्रीकर पुन्हा अमेरिकेलागोव्यात मुख्यमंत्री बदलला तर सरकार पडणार? मुख्यमंत्री अमेरिकेहून परत कधी येतील याची कुणालाच खरी कल्पना नाही. ते आठवड्यानंतर येतील असे सांगून फक्त भाजपा कार्यकर्त्यांची समजूत काढली जात आहे. गोवा सरकारमधील मंत्री यामुळे सैरभैर झाले आहेत. विद्यमान सरकारमध्ये भाजपाकडे फक्त 14 आमदार असून त्यापैकी तिघे गंभीर आजारी आहेत. गोवा फॉरवर्ड, मगोप आणि तिघे अपक्ष यांच्याच आधारावर विद्यमान सरकार टिकून आहे. मुख्यमंत्री वारंवार आजारी होऊ लागल्याने व त्यांचे अनेक दिवस इस्पितळांमध्ये उपचारांसाठीच जाऊ लागल्याने गोव्यातील भाजपही चिंताग्रस्त बनला आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा