पणजी : मांडवी नदीवरील एक पूल बंद ठेवला जाणार नसल्याचे सरकारतर्फे रविवारी स्पष्ट करण्यात आले. तशी चर्चा होती, तसेच नदी परिवहन खात्याला फेरीबोटी सज्ज ठेवण्याचा आदेश दिल्याचे बोलले जात होते. त्यामुळे खात्याचे ज्येष्ठ अधीक्षक विक्रमसिंहराजे भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, अजून कोणतेही निर्देश नाहीत, असे त्यांनी सांगितले. बेती-पणजी जलमार्गावर अलीकडेच तिसरी फेरीबोट सुरू केलेली आहे. दुचाक्यांची संख्या वाढल्याने फेरीबोटी कमी पडतात, अशी तक्रार होती. पणजीच्या आमदाराने पाठपुरावा केल्याने तिसरी फेरीबोट सुरू केली आहे. मांडवीवरील एक पूल बंद केल्यास आणखी किमान तीन ते चार फेरीबोटी या जलमार्गावर लागतील, असे भोसले म्हणाले.
मांडवी पूल बंद करणार नाही
By admin | Updated: August 10, 2015 01:28 IST