शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बँड अॅम्बॅसेडर बनून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 15:19 IST

भाजयुमोतर्फे युवती संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : युवकांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रँड अॅम्बॅसेडर व्हा आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवा असे, आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी येथे केले. भाजयुमोने पणजीत आयोजित केलेल्या युवती संमेलनात ते बोलत होते.

यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, भाजयुमो राष्ट्रीय उपाध्यक्षा अर्पिता बडेजेन, भाजप नेते दामू नाईक, गोवा भाजयुमोचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, सुलक्षणा सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, आज पंतप्रधान मोदींचे कार्य पाहता जगभर देशाचे कौतुक होत आहे. तुम्हा सर्वांना त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर होण्याची संधी आहे. फक्त सभांमध्ये सहभागी होऊन फायदा नाही तर त्यासाठी आपण कार्य केले पाहिजे. भाजपने कसा देशभर विकास केला याची माहिती आपल्या मित्र तसेच आजूबाजूच्या लोकांना सांगणे गरजेचे आहे. विकसित भारत बनविण्यासाठी युवक-युवतींची खरी गरज आहे.

पंतप्रधान मोदींमुळे भारत आज विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर आहे. देश जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. काँग्रेसच्या काळात दोन पंतप्रधान, दोन संविधान व दोन तिरंगा असल्याचे वाटत होते. पण आता एक प्रधानमंत्री एक तिरंगा व एकच संविधानाचे कार्य दिसते. देशात विविध योजना राबविल्या जात आहेत. गोवा सरकारही विविध योजना महिलांसाठी व गरिबांसाठी राबवित आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महिलांना जहाज प्रशिक्षण देणार: नाईक

केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहे. वैमानिकासह अनेक मोठमोठ्या पदावर महिला आहेत. केंद्रीय जहाज बांधणी मंत्राल- यातर्फे गोव्यातील महिलांना जहाजावर काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पंतप्रधान मोदींचे कार्य आणि भाजपचा विकास पाहून अनेक युवक-युवती भाजपकडे वळत आहेत. सुरवातील भाजपकडे केवळ २ खासदार होते आता २०२४ मध्ये हाच आकडा ४०० पार होणार आहे, असेही म्हणाले.

३३ टक्के आरक्षण भाजपमुळे : तानावडे

राजकारणामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे काम भाजपने केले आहे. भाजपने कधीच महिला-पुरुष असा भेदभाव केलेला नाही. म्हणूनच आज देशातील महिला सक्षम झाल्यात. मागील अनेक वर्षे काँग्रेस सरकारच्या काळात महिलांना योग्य ते व्यासपीठ दिले जात नव्हते. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. महिलांसाठी विविध योजनाही भाजपने सुरु केल्या आहेत, असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत