शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासातील तापमानात मोठा फरक, आरोग्याच्या समस्यांची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 22:48 IST

पणजी - राज्यात पुन्हा एकदा तापमान खाली जात असून थंडीचा प्रभाव वाढला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसाचे तापमान आणि रात्रीचे तापमान यात १७ अंश सेल्सीएस म्हणजेच किमान तापमानापेक्षा दुप्पट फरक जाणवू लागला आहे. २४ तासातील या मोठ्या चढउतारामुळे आरोग्याच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत. मागील चार दिवसांपासून किमान तापमान हे १८ ...

पणजी - राज्यात पुन्हा एकदा तापमान खाली जात असून थंडीचा प्रभाव वाढला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसाचे तापमान आणि रात्रीचे तापमान यात १७ अंश सेल्सीएस म्हणजेच किमान तापमानापेक्षा दुप्पट फरक जाणवू लागला आहे. २४ तासातील या मोठ्या चढउतारामुळे आरोग्याच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत. मागील चार दिवसांपासून किमान तापमान हे १८ ते १८.५ एवढे खाली जात आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजापेक्षाही ते खाली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव वाढला आहे. सोमवारी दुपारी ११ वाजेपर्यंत हवेत गारवा जाणवत होता. परंतु नंतर दीड दोनच्या सुमारास तापमान खूपच तापले. किमान तापमान १८.५ तर कमाल तापमान ३५.५ एवढे नोंद झाले आहे. एकाच दिवसात १७ अंश सेल्सीएस एवढा फरक जाणवून आला. ही परिस्थिती मागील चार दिवसांपासून असून चोविस तासात १५ ते १७ अंश सेल्सीएस असा फरक जाणवत आहे. या फरकामुळे आरोग्यावर परिणाम होण्याचीही शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.विशेषत: लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला, कफ  या सारखा उपद्रव होण्याचा संभव अधिक असल्याची माहिती प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ विरेंद्र गावकर यांनी दिली. कमी तापमानात संसर्गजन्य रोगांचाही अधिक फैलाव होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान गोमेकॉतही बाल रुग्ण विभागाच्या ओपीडीत या दिवसात गर्दी उसळळत आहे. सर्दी खोकला, ताप अशाच बहुतेकांच्या समस्या आहेत. बदलत्या तापमानाचाही तो परिणाम असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :goaगोवाTemperatureतापमान