शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मगोपचे नाव बदलणार नाही, कार्निव्हल आमची संस्कृती नव्हे - दिपक ढवळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 21:16 IST

मगो पक्षाचे नाव आम्ही बदलणार नाही. मगोपचा सिंह हा सर्व गोमंतकीयांना प्रिय आहे. पक्षाचे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर व बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. 

पणजी : मगो पक्षाचे नाव आम्ही बदलणार नाही. मगोपचा सिंह हा सर्व गोमंतकीयांना प्रिय आहे. पक्षाचे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर व बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. मगोपचे नाव बदलण्याचा सल्ला दुस-या पक्षांचे काही नेते देत असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, मंत्री ढवळीकर म्हणाले की नावात काही नाही. काम करून दाखवायला हवे. मगो पक्ष जनमत कौल हरल्यानंतरही लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 53 टक्के गोमंतकीयांनी मगोपला मते दिली व पुन्हा सत्तेवर आणले होते. मगोप हा गोमंतकीयांचा पक्ष आहे. मगोप म्हणजे माङया गोंयकारांचो पक्ष असा उल्लेख मी अनेकदा करत असतो. नावात काही नाही. स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव दयानंद बांदोडकर असे होते पण ते लोकांचे भाऊ बनले होते.मंत्री ढवळीकर म्हणाले, की मगोपचे नाव बदलण्याचे सल्ले अन्य पक्षांनी आम्हाला देऊ नयेत. जे राजकीयदृष्टय़ा विजनवासात गेले आहेत, त्यांचे सल्ले तर नकोच. मराठी व कोंकणी ह्या दोन्ही आमच्या भाषा आहेत असेही धोरण मगोपने स्वीकारलेले आहे. येत्या 10 मार्च रोजी मगोपचा स्थापना दिवस विविध कार्यक्रमांनिशी पक्ष साजरा करणार आहे. प्रथम 10 रोजी फर्मागुडी येथे कार्यक्रम होईल. त्यानंतर दि. 17 मार्चपासून सर्व तालुक्यांमध्ये मगोपच्या स्थापनेचे कार्यक्रम होतील. म्हापशात मोठी सभा होईल. भाऊसाहेब बांदोडकर,मगोप, शशिकला काकोडकर यांचे कार्य याविषयीची माहिती असणारी पुस्तिका प्रकाशित केली जाईल. तसेच एक छोटे फिल्म देखील बांदोडकरांविषयी तयार केले जाईल.

कार्निव्हल संस्कृती नव्हे...पेडण्यात मगोपचे एक मंत्री कार्निव्हल करू पाहत असून त्यास विरोध होत असल्याविषयी पत्रकारांनी विचारताच मंत्री ढवळीकर म्हणाले, की कार्निव्हल ही आमची संस्कृती नव्हे. एकेकाळी स्व. डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी देखील कार्निव्हल ही आमची संस्कृती नव्हेच असे जाहीर केले होते. मगोपचे मंत्री बाबू आजगावकर हे पर्यटन मंत्री आहेत आणि पर्यटन खाते किंवा सरकार जे निर्णय घेत आहे, त्यात मगो पक्ष हस्तक्षेप करणार नाही.

टॅग्स :goaगोवा