शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

मडगाव अर्बन सुदृढ बनेल : आंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 21:20 IST

पणजी : मडगाव अर्बन बँकेची स्थिती चांगलीच आहे. ही बँक यापुढे आणखी सुदृढ बनेल, असा विश्वास गेली 28 ते 30 वर्षे या बँकेशी निगडीत राहिलेले माजी चेअरमन व माजी खासदार रमाकांत आंगले यांनी येथे व्यक्त केले.आंगले यांनी बँकेच्या चेअरमनपदाचा व संचालकपदाचा राजीनामा सादर केला आहे. आंगले यांनी मडगाव अर्बन बँकेच्या ...

पणजी : मडगाव अर्बन बँकेची स्थिती चांगलीच आहे. ही बँक यापुढे आणखी सुदृढ बनेल, असा विश्वास गेली 28 ते 30 वर्षे या बँकेशी निगडीत राहिलेले माजी चेअरमन व माजी खासदार रमाकांत आंगले यांनी येथे व्यक्त केले.आंगले यांनी बँकेच्या चेअरमनपदाचा व संचालकपदाचा राजीनामा सादर केला आहे. आंगले यांनी मडगाव अर्बन बँकेच्या संचालकपदी यापूर्वी अनेकांना स्वत:च्या पॅनलमधून निवडून आणले व या बँकेची स्थिती सुधारावी म्हणूनही योगदान दिले आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने लोकमतशी सविस्तरपणो बोलताना आंगले म्हणाले की, 1999 साली मी मडगाव अर्बनची सुत्रे हाती घेतली तेव्हा बँकेकडे फक्त 14 कोटींच्या ठेवी होत्या. मी बँकेचा आता राजीनामा दिला, त्यावेळी बँकेच्या ठेवी 333 कोटी आहेत. आमच्याकडे 135 कर्मचारी असून सर्वाना दर महिन्यास अगदी वेळेत वेतन दिले जाते. एक दिवस अगोदरच आम्ही वेतन देतो. मडगाव अर्बन बँकेला आरबीआयने 1क् कोटींनी एनपीए कमी करा असे सांगितले होते पण आम्ही तेरा कोटींनी कमी करून दाखवला. आम्ही बँकेसाठी 40 कोटींची तरतुद स्वतंत्रपणो करून ठेवली आहे. म्हणजेच 40 कोटी रुपये बाजूलाच ठेवले आहेत. प्रत्येक बँकेला अशी तरतुद करावी लागते. आंगले म्हणाले, की मडगाव अर्बनची स्थिती सुधारली आहे व यापुढेही ती सुधारेलच. किशोर नाव्रेकर यांनी बँकेच्या चेअरमनपदाची सुत्रे हाती घ्यावीत अशी विनंती मी त्यांना यापूर्वीच केली होती. सगळे संचालक माङयासोबत आहेत. माझा सल्ला जेव्हा जेव्हा चेअरमन किंवा संचालकांना घ्यावा असे वाटेल तेव्हा मी त्यांना सल्ला देईनच. कारण मडगाव अर्बन बँकेशी मी भावनिकदृष्टय़ा जोडलो गेलेलो आहे. ही बँक मी प्रसंगी पदरमोड करूनही चालवली. काही लोकांनी सोने गहाण ठेवून कज्रे घेतली होती, त्यांना मी कज्रे भरण्यासाठी मदत केल्याची उदाहरणो आहेत. माङया पत्नीचे निधन झाल्यानंतर माङयावरील टेन्शन वाढले. मी खंतावलो. अशा स्थितीत मी लक्ष केंद्रीत करू शकत नाही व न्याय देऊ शकणार नाही. म्हणून किशोर नाव्रेकर व माङया अन्य सहकारी संचालकांना मी बँकेची सुत्रे हाती घेण्यास सांगितले. नाव्रेकर व इतरांनी काल गुरुवारी देखील माङयाशी सल्लामसलत केली आहे. आमच्यामध्ये अतिशय चांगले वातावरण आहे. बँकेच्या हितासाठीच यापुढेही मी वावरेन. फक्त पदावर असणार नाही.