शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

बलात्काराच्या खोट्या तक्रारी करून कोट्यवधी कमावले; गोव्यात पकडलेल्या युवतींचे मुंबई व दमणमध्येही कारनामे

By वासुदेव.पागी | Updated: October 12, 2023 18:00 IST

बलात्काराच्या खोट्या तक्रारी नोंदविण्याची धमकी देऊन धनाड्य लोकांना ब्लेकमेलिंग करणाऱ्या  गुजरातमधील दोन युवती आणि त्यांना सहकार्य करणारा एक दलाल अशा तिघांच्या कृष्णकृत्यांचा कोलवाळ पोलिसांनी भांडाफोड केला होता.

पणजीः बलात्काराच्या खोट्या तक्रारी नोंदवून लोकांना ब्लॊकमेलिंग करणाऱ्या दोन गुजराती युवतींच्या कारनाम्याचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश करेपर्यंत या युवतींनी  मुंबई आणि दमणमध्येही असेच कारामे करून कोट्यवधी रुपये कमाविले असल्याची माहिती आहे. 

बलात्काराच्या खोट्या तक्रारी नोंदविण्याची धमकी देऊन धनाड्य लोकांना ब्लेकमेलिंग करणाऱ्या  गुजरातमधील दोन युवती आणि त्यांना सहकार्य करणारा एक दलाल अशा तिघांच्या कृष्णकृत्यांचा कोलवाळ पोलिसांनी  भांडाफोड केला होता. त्यानंतर कळंगूट पोलिसांनी त्यांना अटक केली होती.  गोव्यात असे कारनामे करण्यापूर्वी त्यांनी खुद्द गुजरातमध्ये तसेच मुंबई आणि दमणमध्येही अनेक धनाड्य लोकांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून मोठी रक्कम जमविली अशी माहिती गोवा पोलिसांच्या सूत्रांकडून देण्यात आली. या प्रकरणाचा तपास सध्या क्राईम ब्रँच करीत आहे. सोशल मिडियाच्या माद्यमातून सावध हेरून त्यांना लक्ष्य बनविणे, त्यानंतर त्यांच्याशी सलगी करणे आणि नंतर बलात्कार केल्याचा आरोप करणे. त्याच्याकडे मोठ्या रक्कमेची मागणी करणे आणि पैसे न दिल्यास पोलीसात तक्रार नोंदविण्याची धमकी देणे अशी त्यांची मोडस ऑपरेन्डी होती. पैसे न दिल्यास पोलीसात तक्रार करायच्या. तक्रार करण्यासाठी पोलीस स्थानकात जाताना एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे आपले कपडे स्वत:च फाडून घेऊन खरोखऱ्च पीडीत युवती वाटाव्यात अशा पद्धतीने सर्व नाटके चालली होती. गुजरातमध्ये भल्या भल्यांना या पद्धतीने लुबाडून त्यांनी मोर्चा गोव्याकडे वळविला होता. त्याच नादात त्यांनी आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार कोलवाळ पोलिस स्थानकात केली, आणि तिथेच मोठी चूक करून बसल्या.  कोलवाळ पोलिसांनी केवळ त्यांच्या तक्रारीवर तपास न करता त्यांचा सखोल तपास केला.  लोकांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी बलात्काराच्या खोट्या तक्रारी नोंदविण्याचा या युवतींचा धंदा असल्याचे तपासातून उघडकीस आले.   

गुजरात्यांनाच करायच्या बळीचे बकरेया युवतींनी  गोवा, गुजरात, महाराष्ट्र आणि दमणमध्ये जे गुन्हे केले त्या सर्व गुन्ह्यात एक समान  गोष्ट आढळून आली आहे, आणि ती म्हणजे  ब्लॅकमेलिंगसाठी बळीचा बकरा त्या गुजरातीच माणसाला निवडायच्या. त्यांचा पोलिसांशी ओळखी किंवा वशिला असू नये यासाठी  त्यांना दुसऱ्या राज्यात नेऊन फसविण्याचे काम त्या करीत होत्या.

टॅग्स :goaगोवा