शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर ! गोव्यात एका वर्षातच बांगड्यांचे उत्पन्न दुप्पट, प्रजननासाठी स्थलांतर केल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 16:03 IST

गोवेकरांसाठी खुशखबर ! गोव्यात यंदा एकुण मत्स्य उत्पादनात २० टक्के घट झाली असली तरी गोमंतकीयांचा आवडीचा ‘बांगडा’ दुप्पट वाढला आहे.

मडगाव : गोवेकरांसाठी खुशखबर ! गोव्यात यंदा एकुण मत्स्य उत्पादनात २० टक्के घट झाली असली तरी गोमंतकीयांचा आवडीचा ‘बांगडा’ दुप्पट वाढला आहे. २०१५-१६ या कालावधीत गोव्यात ११ हजार ४३२ टन बांगडा पकडला होता़ २०१६-१७ कालावधीत हे प्रमाण २२ हजार ५३१ टनावर पोहचले आहे.गोव्यातील मच्छिमार खात्याकडून ही माहिती प्राप्त झाली आहे़. बाजारात मोठ्या प्रमाणावर बांगड्यांची आवक वाढल्याने त्याच्या किंमतीही उतरल्या आहेत. सध्या गोव्यातील किरकोळ बाजारात १०० रूपयाना १२ बांगडे मिळतात़. आॅक्टोबरच्या मध्यंतरात १०० रूपयांना केवळ ६ बांगडे मिळायचे़ बांगडा हा एकुणच रूचकर मासा असून गोव्यातच नव्हे तर जवळच्या राज्यातही बांगड्यांचे प्रमाणवाढले आहे़ या संबंधी मत्स्योद्योग खात्याच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता, बांगड्यांचे प्रमाण एकदम कसे वाढले याचे कारण अजून समजले नाही़ यासंबंधी शास्त्रीय अभ्यास चालू आहे असे त्यानी सांगितले़.कोची-केरळ येथील सेंट्रल मरिन फि शरिज रिसर्च इन्स्टिट्यूटचे तज्ञ टी़व्ही़ सत्यनंदन यांच्या मताप्रमाणे फ क्त गोव्यातच नव्हे तर भारताच्या दक्षिण - पश्चिम समुद्र पट्टयात बांगडयांचे प्रमाण वाढले आहे़ हे प्रमाण का वाढले असे त्याना विचारले असता ते म्हणाले, कित्येक कारणे असू शकतात मात्र महत्वाचे कारण म्हणजे कित्येक वेळा मासे प्रजननासाठी सुरक्षित व चांगले स्थान मिळावे यासाठीस्थलांतर करतात त्यामुळे असे बदल घडून येऊ शकतात. या संबंधी गोव्यातील समुद्र विज्ञान संस्थेकडूनही अभ्यास चालू आहे अशी माहिती या संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ ए़सी़. अनिल यांनी दिली़.

टॅग्स :goaगोवा