शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फालेरोंच्या पराभवानंतरच आलेख चढला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 19:23 IST

माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचा 2007 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी नावेली मतदारसंघात पराभव झाला. फालेरो यांची राजकीय कारकिर्द आता संपली असा निष्कर्ष त्यावेळी काँग्रेसमधील व काँग्रेसबाहेरील त्यांच्या विरोधकांनीही काढला होता, पण प्रत्यक्षात त्या पराभवानंतरच फालेरो यांचा राजकीय आलेख उंचावत गेला.

पणजी - माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचा 2007 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी नावेली मतदारसंघात पराभव झाला. फालेरो यांची राजकीय कारकिर्द आता संपली असा निष्कर्ष त्यावेळी काँग्रेसमधील व काँग्रेसबाहेरील त्यांच्या विरोधकांनीही काढला होता, पण प्रत्यक्षात त्या पराभवानंतरच फालेरो यांचा राजकीय आलेख उंचावत गेला. आता पुन्हा फालेरो यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसपद आणि ईशान्येकडील राज्यांचे प्रभारीपद प्राप्त झाल्याने फालेरो यांचे विरोधक गारद झाले आहेत. फालेरो यांची राजकीय उंची गोव्यातील काँग्रेसमध्ये वाढली आहे.

फालेरो यांचा पराभव 2007 साली चर्चिल आलेमाव यांनी केला होता. आलेमाव यांनी त्यावेळी सेव्ह गोवा पक्ष स्थापन करून त्या पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. 1999 साली दोनवेळा मुख्यमंत्रीपद आणि अनेक वर्षे गोव्यात मंत्रीपद भुषविलेल्या फालेरो यांच्या हाती 2007 सालच्या पराभवानंतर त्यावेळी काहीच शिल्लक राहिले नव्हते. आलेमाव यांनी नावेली काबिज केले होते व त्यामुळे फालेरो यांना काँग्रेसच्या त्यावेळच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीसपद दिले होते. शिवाय ईशान्येकडील सात राज्यांचे प्रभारीपद दिले होते. सात वर्षे फालेरो यांचा गोव्याशी राजकीयदृष्टय़ा मोठा संबंध राहिला नव्हता. फालेरो व आलेमाव यांच्यातील राजकीय शत्रूत्व खूप वाढले होते. आलेमाव यांनी आपल्या सेव्ह गोवा पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून व दिगंबर कामत सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून स्थान मिळविल्यानंतर फालेरो यांच्या जखमांवर मिठ चोळले गेले होते. 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या काळात फालेरो यांना गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गोव्यात पाठवले गेले होते. काँग्रेसला त्या निवडणुकीत 16 जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे फालेरो यांनी 2क्क्7 साली स्वत: नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवली व ते जिंकूनही आले. या उलट आलेमाव यांचा 2012 च्या निवडणुकीत नावेलीत पराभव झाला होता. आवेर्तान फुर्तादो यांनी नावेलीत चर्चिलला पराभूत केले होते. चर्चिलला 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट हवे होते पण काँग्रेसने तिकीट दिले नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले पण नावेली सोडून त्यांना बाणावली मतदारसंघात जावे लागले. 2017 च्या निवडणुकीच्या काळात फालेरो व चर्चिल यांच्यात पुन्हा मैत्रीचे नाते तयार झाले. आता या दोन्ही नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र फालेरो यापुढील विधानसभा निवडणूक पुन्हा लढवतील की नाही ते स्पष्ट नाही. फालेरो हे काँग्रेसच्या दिल्लीतील राजकारणातच आता नव्याने स्थिरावू शकतात. त्यांना ईशान्येकडील राज्यांचे प्रभारीपद सांभाळणो जास्त आवडते. फालेरो यांनी 2017 च्या निवडणूक निकालानंतर गोव्यात मुख्यमंत्रीपद मिळविण्याचा प्रयत्न केला होता पण दिग्वीजय सिंग यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी फालेरो यांची निवड होणार नाही याची काळजी घेतली. आता दिग्वीजय सिंग यांच्यापेक्षाही फालेरो यांचे स्थान काँग्रेसमध्ये वाढले आहे. दिग्विजय सिंग यांना तूर्त काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दूर ठेवले आहे.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण