शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लोकोस्तवातील स्टॉलधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 14:45 IST

लोकोस्तवात देशभरातील विविध विक्रेत्यांनी आपली दालने मांडली आहेत मोहम्मद फिरोज यांनीही यंदाच्या लोकोत्सवात आपला स्टॉल घातला होता.

- नारायण गावस

पणजी: पणजी राजधानीतील कलाअकादमीच्या दर्यासंगमावर आयोजित केलेल्या लोकोत्सवातील एका स्टॉलधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

या स्टॉलधारकाचे नाव मोहम्मद फिरोज (५०) उज्जैन-मध्यप्रदेश येथील असून आज बुधवारी पहाटे त्यांना ह्रदयविकाराच्या तीव्र झटका येऊन मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात ठेवण्यात आला असून सर्व  वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहेत. 

आज सायंकाळी विमानाने त्यांचा मृतदेह मध्य प्रदेशला नेण्यात येणार आहे. लोकोस्तवात देशभरातील विविध विक्रेत्यांनी आपली दालने मांडली आहेत मोहम्मद फिरोज यांनीही यंदाच्या लोकोत्सवात आपला स्टॉल घातला होता. त्यांचे कुटुंबियही त्यांच्यासोबत होते. तसेच त्यांचे शेजारीही स्टॉल घालून त्यांच्या सोबत होते. 

या विषयी अधिक माहिती देताना कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, घडलेली घटना खरी असून सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला. याविषयी पोलिसांनी पंचनाम‍ा केल्यानंतर मोहम्मद फिरोज य‍ांचा मृतदेह गोमेकॉत ठेवण्यात आला आहे. आज सायंकाळी त्य‍ांचा मृतदेह विमानाने मध्य प्रदेशला पाठवण्याची सोयही करण्यात आली आहे.

टॅग्स :goaगोवा