शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

लोकमत इफेक्ट, मुख्यमंत्री पर्रिकरांनी तातडीने घेतली मंत्र्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 19:56 IST

मंत्रिमंडळातील एखाद्या  मंत्र्यांने आक्रमक भूमिका घेत  धमकी दिली तरी गोव्याच्या प्रशासनावर कोणताही परिणाम होत नाही अशा आशयाचे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या  वृत्ताची गंभीर दखल घेतली व तातडीने शुक्रवारीच मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया मार्गी लावली.

 - सदगुरू पाटील

पणजी, दि. २२ -  मंत्रिमंडळातील एखाद्या  मंत्र्यांने आक्रमक भूमिका घेत  धमकी दिली तरी गोव्याच्या प्रशासनावर कोणताही परिणाम होत नाही अशा आशयाचे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या  वृत्ताची गंभीर दखल घेतली व तातडीने शुक्रवारीच मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया मार्गी लावली.

आपल्या सालीगाव मतदारसंघातील नेरूल वगैरे भागात पाण्याचा पुरवठाच होत नाही अशी तक्रार गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी केली होती पण बांधकाम खात्याचे अभियंते लक्ष देईना. मंत्री साळगावकर यांनी शेवटी चिडून आपण यापुढे जलवाहिनीच फोडीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर राज्यात मोठा गजहब निर्माण झाला. राजकीय गोटात खळबळ उडाली. जलवाहिनीच्या टोकावर जिथे सिमेंट घातले गेले आहे त्यामूळे पाणी पुढे वाहत नाही. त्यामुळे सिमेंटच्या जागी आपण जलवाहिनी फोडेन असे साळगावकर म्हणाले होते. मात्र आठ दिवस झाले तरी गोवा प्रशासनाने या धमकीची काहीच दखल घेतली नाही. मंत्र्याने जलवाहिनी फोडण्याची धमकी देऊन देखील प्रशासन ढिम्म व मंत्र्याच्या मतदारसंघातील नळ कोरडेच असे वृत्त लोकमतने देताच चक्रे हलली. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सकाळीच मंत्री जयेश साळगावकर यांना फोन केला व तातडीने बैठकीसाठी बोलावले. बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर, जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर, आमदार मायकल लोबो व वरिष्ठ अभियंत्यांना बैठकीसाठी बोलविण्यात आले. सर्वांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली व पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी विविध ठोस अशा  उपाययोजना जाहीर केल्या. मंत्री साळगावकर यांच्या मतदारसंघात रोज पाणी पुरवठा व्हायलाच हवा असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अभियंत्यांना बजावले. तसेच यापुढे पाणी साठविण्यासाठी लोकांना टाक्या दिल्या जातील असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.मंत्री साळगावकर यांनी बैठकीनंतर लोकमतशी बोलताना सरकारच्या नव्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले. आता तरी प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Governmentसरकार