शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

आपल्याला उमेदवारी नाकारण्यास स्थानिक नेतृत्व जबाबदार : विजय भिके 

By काशिराम म्हांबरे | Updated: April 6, 2024 15:29 IST

विजय भिके यांना पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्याच्या कारणास्तव त्यांनी स्थानिक पक्ष नेतृत्वावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 

म्हापसा: उत्तर गोव्यातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले पक्षाचे महासचिव विजय भिके यांना पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्याच्या कारणास्तव त्यांनी स्थानिक पक्ष नेतृत्वावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्यासोबत भिके हे सुद्धा इच्छुकांच्या यादीत होते. भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून खलप यांना उत्तर गोव्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भीके यांना सतत दोन वेळा म्हापसा मतदार संघातून विधानसभेचे तसेच आता उत्तर गोव्यातून लोकसभेसाठीची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. पक्षाचे स्थानिक नेतृत्व दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर युवा नेत्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी अपयशी ठरले असल्याचा तसेच आपल्याला उमेदवारी मिळवून देण्यासाठी स्थानिक नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप भिके यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. मागील अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य केल्याचे हीच पावती आपल्याला मिळते का असा ही प्रश्न त्यांनी केला. युवा नेत्यांना उमेदवारी नाकारल्याने पक्षात नवी पिढी कशा पद्धतीने तयार होईल, त्यांना न्याय कसा मिळेल असाही प्रश्न त्यांनी केला.

स्थानिक पक्षनेते यापूर्वी सुद्धा अपयशी ठरले असून आता ही ते अपयशी ठरतील असाही दावा भिके यांनी बोलताना केला. उमेदवारी देण्यात आलेले खलप यांना यापूर्वी उत्तर गोव्यातून तीन वेळा उमेदवारी देण्यात आली असल्याची आठवण भिके यांनी करून दिली. पक्षाने आपल्याला संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. तसेच भविष्यात पक्षासाठी कार्य करीत राहण्याचे, पक्षाकडून घेतल्या जाणाऱ्या चुकीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवण्याचे तसेच नवी पिढी तयार करण्यास कार्यरत राहण्याचे आश्वासनही भिके यांनी दिले.

टॅग्स :goaगोवा