शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे हॉटेल व्यवसायाला फटका बसल्याची तक्रार वाणिज्य कर आयुक्तांनी फेटाळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 13:15 IST

जीएसटीमुळे हॉटेल व्यवसायाला फटका बसला असल्याची तक्रार येथील हॉटेलमालक करीत असले तरी वाणिज्य कर आयुक्त दिपक बांदेकर यांनी ही तक्रार फेटाळून लावली आहे.

ठळक मुद्देजीएसटीमुळे हॉटेल व्यवसायाला फटका बसला असल्याची तक्रार येथील हॉटेलमालक करीत असले तरी वाणिज्य कर आयुक्त दिपक बांदेकर यांनी ही तक्रार फेटाळून लावली. २८ टक्के कर केवळ पंचतारांकित हॉटेलांना लागू असून खोलीचे भाडे ७५00 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच हा कर लागू होतो त्यामुळे व्यावसायिकांनी तक्रार निरर्थक आहे.गोव्यात या पर्यटक मोसमात पर्यटकांची संख्या सुमारे ५0 टक्क्यांनी घटली.

पणजी - जीएसटीमुळेहॉटेल व्यवसायाला फटका बसला असल्याची तक्रार येथील हॉटेलमालक करीत असले तरी वाणिज्य कर आयुक्त दिपक बांदेकर यांनी ही तक्रार फेटाळून लावली आहे. बांदेकर म्हणाले की, ‘२८ टक्के कर केवळ पंचतारांकित हॉटेलांना लागू असून खोलीचे भाडे ७५00 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच हा कर लागू होतो त्यामुळे व्यावसायिकांनी तक्रार निरर्थक आहे.’ 

गोव्यात या पर्यटक मोसमात पर्यटकांची संख्या सुमारे ५0 टक्क्यांनी घटली. जीएसटीमुळे हॉटेलांचे वाढलेले प्रचंड दर याला कारणीभूत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. राज्यात पर्यटन व्यवसायाचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष सावियो मेशियस यांनीही जीएसटीमुळे परिणाम झाल्याचे म्हटले होते. 

दरम्यान, आयुक्त बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसटीतून गोवा सरकारला दर महिना सरासरी २00 कोटी रुपये मिळतात. याशिवाय पेट्रोल, मद्यावरील व्हॅटव्दारे महसूल मिळतो तो वेगळा असल्याचे सांगण्यात आले. ते म्हणाले की, ‘केंद्र सरकारने बहुतांश वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरुन कमी करुन १२ ते १८ टक्क्यांवर आणला. सिगारेट, शीतपेये, वाहने, सिमेंट अशा अवघ्याच काही वस्तूंवर २८ टक्के कर राहिला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जीएसटी प्रणाली आता  येथील व्यापाऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे. सुमारे ३६ हजार डीलर्सनी नोंदणी केली असून ७५ लाख रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेले ५ हजार डीलर्स कंपोझिशन योजनेचा लाभ घेत आहेत. 

टॅग्स :goaगोवाGSTजीएसटीhotelहॉटेल