शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनापासून लिहलेल्या साहित्याला भाषेचे अडथळे येत नाहीत - मर्सी मार्गारेट

By समीर नाईक | Updated: February 17, 2024 16:17 IST

गोवा कोंकणी अकादमतर्फे व्ही. एम साळगांवकर कायदा महाविद्यालय यांच्या साहाय्याने आयोजित २३ वे युवा कोंकणी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे या नात्याने मार्गारेट उपस्थित होत्या.

पणजी: साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलीही भाषा कधीच अडथळा ठरत नाही. मनापासून लिहलेले कुठलेही साहित्य एकाद्याच्या मनापर्यंत सहज पोहचत असते, हेच साहित्याचे सौंदर्य आहे, असे प्रतिपादन तेलंगणा येथील प्रसिद्ध साहित्यिक मर्सी मार्गारेट यांनी केले.

गोवा कोंकणी अकादमतर्फे व्ही. एम साळगांवकर कायदा महाविद्यालय यांच्या साहाय्याने आयोजित २३ वे युवा कोंकणी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे या नात्याने मार्गारेट उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्यासोबत गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत, सचिव मेघना शेटगावकर, कोंकणी भाषा मंडळच्या अध्यक्ष अन्वेशा सिंगबाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

गोव्यातील युवा खूप नशीबवान आहे की त्यांना युवा स्थितीत साहित्य क्षेत्रात आपली छाप सोडण्याची संधी मिळत आहे. कोंकणी भाषेला हा मोठा मान आहे. कोंकणीच्या तुलनेत तेलगुतील साहित्य खूप कमी आहे, तसेच तेथील युवकांना देखील संधी आणि प्रोत्साहन कमीच मिळत असते.   साहित्य संमेलनातून नेहमीच काही नवीन शिकायला मिळते, त्यामुळे यंदा देखील ही संधी आम्हाला मिळाली आहे, याचा पुरेपूर उपयोग आपले साहित्य अधिक समृध्द करण्यासाठी आपण केला पाहिजे, असे मार्गारेट यांनी यावेळी सांगितले.

साहित्य लीहताना मनात संभ्रम असणे महत्वाचे आहे. आपण जे लिहिले आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या लायकीचे आहे की नाही, याबाबत मनात सातत्याने प्रश्न येणे आवश्यक आहे. तरच आमचे साहित्य अधिक दर्जेदार होऊ शकते, तसेच या वाटचालीत नेहमीच मोठ्या साहित्यिकांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. कोंकणी भाषेचा प्रचार व प्रसार हा आमच्या पिढी मोठी जबाबदारी आहे, असे यावेळी सिंगबाळ यांनी सांगितले.

सदर साहित्य संमेलन रविवारपर्यंत चालणार असून, या दरम्यान विविध चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील अनेक वक्ते यावेळी उपस्थित असणार आहे. तसेच विविध पुरस्कार यादरम्यान देण्यात येणार आहे.

टॅग्स :goaगोवा