शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

जीवरक्षक किना-यावरचे जीवनदायी, 3 हजार लोकांचे वाचवले जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 19:13 IST

गोवा म्हणजे समुद्र किनारा. या किना-यावरील निसर्गाचे सौंदर्य लुटण्यासाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीला पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही.

म्हापसा : गोवा म्हणजे समुद्र किनारा. या किना-यावरील निसर्गाचे सौंदर्य लुटण्यासाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीला पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही. या मोहापायी पाण्यात उतरलेल्या अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. मग ती पोहता न आल्याने असो पाण्याच्या गतीमान प्रवाहामुळे असो किंवा नशेत असो. हा मोह आवरता यावा. लोकांचे बहुमूल्य जीव वाचवावे त्यांना सुरक्षा मिळावी म्हणून सरकारने किना-यावर जीव रक्षकांची नेमणूक केली आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता प्रसंगी जीव धोक्यात घालून किना-यावर येणा-या लोकांना बहुमूल्य असे मार्गदर्शन करणा-या या जीव रक्षकांकडे किना-यावरील जीवनदायिनी म्हणून बघितले जाते. आता नवीन पर्यटन हंगाम सुरू झाल्याने पुन्हा त्याच आव्हानांना सामोरे जाण्यास ते सज्ज झाले आहेत. यांच्या नेमणुकीमुळे बुडून मरण्याच्या प्रकार ९९ टक्क्यांनी कमी झाले आहेत.विविध समुद्र किना-यांवर दृष्टीच्या वतीने सुमारे ६०० जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. काही किना-यांवर सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तर काही किना-यांवर रात्रीच्या वेळीही हे जीवरक्षक सेवा पुरवत असतात. पर्यटनाच्या बिगर हंगामी दिवसात सुद्धा किना-यावर सेवा बजावणा-या या जीव रक्षकांची खरी कसोटी हंगाम सुरू झाल्यानंतर लागते. डोळ्यात तेल घालून त्यांना लोकांच्या जीवाचे रक्षण करावे लागते. स्वत:चे जीव धोक्यात घालून हे जीवरक्षक लोकांचे जीव वाचवतात. राज्यातील महत्त्वाच्या समुद्र किना-यावर दृष्टीच्या जीवरक्षकांची सरकारने नेमणूक केली आहे.आॅक्टोबर २००८ पासून सुरू केलेल्या सेवेत अजूनपर्यंत ३ हजार लोकांचे जीव वाचवण्यात आले आहेत. यात २०१४ साली ४२५, २०१५ साली ३३०, २०१६ साली ४०८ तर या वर्षी अजूनपर्यंत १९५ लोकांचे प्राण जीवरक्षकांनी वाचवले आहेत. सरासरीवर प्रती किनारे १४ रक्षकांची नेमणूक केली जाते. कळंगुट तसेच कोलवा सारख्या किना-यावर २२ जणांची नेमणूक केली आहे. एकूण ३८ किना-यावर तसेच दूधसागर धबधब्यावर व मये येथील तलावावर त्याची नेमणूक केली आहे. यात उत्तरेतील १६ तर दक्षिणेतील २२ किना-यांचा समावेश आहे.ही सेवा उत्तरेतील केरी, हरमलपासून ते दक्षिणेतील पाळोळे पर्यंत महत्त्वाच्या किना-यांवर सुरू आहे. यात कळंगुट, मिरामार, बोगमाळो, वार्का तसेच इतर किना-यांचा समावेश आहे. मानवाच्या जीवाचे संरक्षण करताना समुद्र किना-यावर अंडी घालण्यासाठी येणा-या कासवांचे संवर्धन करणे, लोकांना मार्गदर्शन करणे तसेच इतर महत्त्वाची कामे हे जीवरक्षक जीवाची तमा न बाळगता अत्यंत कुशलतेने करतात. या जीवरक्षकांना अत्यंत चांगल्या तसेच उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.या सेवेत काम करणा-या जीवरक्षकांना प्रशिक्षणा बरोबर प्रथोमचार पुरवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे बुडलेल्या लोकांना अनेकवेळा तिथल्या तिथे उपचार देऊन त्यांना वाचवण्यात आले आहे. लोकांनी पोहण्याची सुरक्षित जागाही त्यांच्या वतीने किनारी भागात लाल झेंडे लावून निर्देशित केली आहे. या जीवरक्षकांना सेवा देण्यासाठी वॉच टॉवर, जीव वाचवण्याच्या वापरात येणारी उपकरणे, सुचना फलक, विश्रांतीसाठी सुविधा तसेच इतर अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.जीव वाचवण्यासाठी लागणारी सर्व उपकरणांनी ते युक्त आहेत. किना-यांवर पायी सुरक्षा पुरवताना वाहना वरुनही त्यांची सततची गस्त सुरूच असते. पुरूष रक्षका बरोबर महिला जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या रक्षकांनी ब-याच समुद्र किना-यांवर सुरक्षित पोहण्याची जागा, महिलांसाठी पोहण्याची जागा, असुरक्षित पोहण्याची जागा निश्चित केली आहे. त्यामुळे त्याचा फायदा समुद्रात जाणा-या असंख्य लोकांना होत असतो. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून हे जीवरक्षक सेवा पुरवत असतात.या जीवरक्षकांच्या अनेक समस्या असून आपली जबाबदारी पार पाडताना अनेक वेळा त्यांना मारही खावा लागतो. दारू पिऊन किनारी भागात दंगा करणा-यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. नशेत असलेले लोक अनेकदा जीवरक्षकांनी दिलेला सल्ला न मानता समुद्रात उतरतात. त्यांचा विरोध न जुमानता ते त्यांना प्रवृत्त करीत असतात. प्रसंगी पोलिसांची सुद्धा मदत घेत असतात. किना-यावर येणा-या लोकांचे जीव वाचवण्यास दृष्टीचे जीवरक्षक सततपणे मेहनत घेत असल्याची माहिती दृष्टीचे सरव्यवस्थापक पी. एन. पांडे यांनी दिली.