शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कायदा हाती घेणाऱ्यांना रासुका लावू, आयजीपींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 20:08 IST

सांताक्रूझ टोळी युद्ध हे दोन गटातील वैमन्‍यासातून झाले असले तरी त्याचा त्रास लोकांना झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना कडक  कारवाई करण्याचा इशारा मुख्यालयातून देण्यात आला आहे.

पणजी: कायदा हाती घेणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) कारवाई करण्याचा इशारा पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी दिला आहे. सांताक्रूझ गँगवॉरनंतर झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.  

सांताक्रूझ टोळी युद्ध हे दोन गटातील वैमन्‍यासातून झाले असले तरी त्याचा त्रास लोकांना झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना कडक  कारवाई करण्याचा इशारा मुख्यालयातून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या एका तातडीच्या बैठकीत रासुका लागू करण्यासंबंधी चर्चा झाली. कायदा सुव्यवस्था बिघडवू पाहणा-यांविरुद्ध गरज पडल्यास रासुका लावण्याचा पर्यायही पोलीस खात्याने खुला ठेवला आहे. 

या बैठकीत त्यावर  शिक्कामोर्तबही झाल्याची माहिती पोलीस मुख्यालयानेच जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.  शिवाय, गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांची यादी करून त्यांना तडीपार करण्याचीही प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. 

एकूण 13 टोळी युद्धवाल्यांना अटकपोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत सांताक्रूझ टोळी युद्धातील संशयित नागोवा येथील सर्वेश दिवकर, व्हडलें भाट येथील यासीन नामक युवक, करंजाळे येथील साहील नामक युवकाला तसेच, सांताक्रूझ येथील जयेश नामक युवकाला अटक करण्यात आली. या चार जणांना अटक करण्यापूर्वी टोळी युद्धाच्या दिवशी 9 जणांना अटक करण्यात आली होती. शिवाय दोघे अल्पवयीनही या प्रकरणात आढळले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 13 झाली आहे.  आणखी किमान 4 जण दडून बसल्याचा संशय पोलिसांना आहे. 

टॅग्स :goaगोवा