शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सहा इंडोनेशियन महिलांना गोवा सोडून जाण्याची नोटीस, व्हिसाचे उल्लंघन केल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 17:46 IST

एका औषधाच्या आस्थापनात स्पा प्रशिक्षक म्हणून व्हिसा मिळवून प्रत्यक्षात गोव्यात एका सलूनमध्ये मसाज पार्लरचे काम करणा-या सहा इंडोनेशियन महिलांना देश सोडून जाण्याची नोटीस एफआरआरओ विभागाने बजावली आहे.

मडगाव: एका औषधाच्या आस्थापनात स्पा प्रशिक्षक म्हणून व्हिसा मिळवून प्रत्यक्षात गोव्यात एका सलूनमध्ये मसाज पार्लरचे काम करणा-या सहा इंडोनेशियन महिलांना देश सोडून जाण्याची नोटीस एफआरआरओ विभागाने बजावली आहे. मात्र या नोटीसीला सदर महिलांतर्फे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले आहे.गोवा पोलिसांच्या विदेशी क्षेत्रीय विभागाचा ताबा असलेले पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या सहाही इंडोनेशियन महिला भारतात अजंटा मेडिकल्समध्ये स्पा प्रशिक्षक म्हणून नोकरीच्या व्हिसावर आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात त्या पणजी येथील ‘स्नीप सलून्स स्पा’मध्ये मसाज करण्याचे काम करत होत्या.या सहाही महिलांनी व्हिसा परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विदेशी क्षेत्रीय नोंदणी अधिका-यांनी सध्या त्यांना देश सोडून जाण्याची नोटीस बजावली आहे. मात्र या नोटीसीला उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर शुक्रवारी 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, फेब्रुवारी ते मार्च 2018 मध्ये दर वर्षाला 25 हजार डॉलर्स या वेतनावर या महिलांना गोव्यात आणण्यात आले होते. विदेशी नागरिकांना भारतात आल्यावर 14 दिवसात एफआरआरओ कार्यालयात स्वत:ची नोंदणी करुन घेण्याची गरज आहे. मात्र मे महिन्यार्पयत यापैकी कोणीही आपली नोंदणी करुन घेतली नव्हती. मे 2018 मध्ये त्या नोंदणीसाठी या कार्यालयात आल्या असता दंड आकारुन त्यांची नोंदणी करण्यात आली. मात्र त्यावेळी त्यांनी आपल्या व्हिसांच्या अटींचे उल्लंघन केल्याचेही उघडकीस आले. यासंदर्भातील माहिती गृह व्यवहार मंत्रालयाला दिल्यानंतर या सर्वाना काळ्या यादीत टाकून 20 सप्टेंबर्पयत त्यांना देश सोडून जाण्याची नोटीस बजावली होती. सदर महिलांनी व्हिसा परवान्याचे उल्लंघन करण्याबरोबरच आयकर न भरल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Visaव्हिसाgoaगोवा