शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला आजारी रजा द्या, विरोधकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 18:30 IST

गोव्यातील विद्यमान भाजपाप्रणीत आघाडी सरकारमधील मंत्री एका पाठोपाठ आजारी पडू लागल्याने विरोधकांनी सरकारविरुद्ध नव्याने रान उठविणे सुरू केले आहे.

पणजी : गोव्यातील विद्यमान भाजपाप्रणीत आघाडी सरकारमधील मंत्री एका पाठोपाठ आजारी पडू लागल्याने विरोधकांनी सरकारविरुद्ध नव्याने रान उठविणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री, वीजमंत्री वगैरे इस्पितळात आहेत तर ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे विदेश दौ-यावर गेले आहेत. अशा वेळी राज्यपालांनी पूर्ण सरकारलाच आजारी रजा मंजूर करावी, अशी मागणी विरोधकांनी सुरू केली आहे.

यापूर्वी काँग्रेसने राज्यपालांना निवेदन सादर करून सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. आपण बहुमत सिद्ध करू शकतो, असा दावा काँग्रेसने करून मुख्यमंत्री दीर्घकाळ अमेरिकेत असल्याने प्रशासन ठप्प झाले आहे, अशी टीका काँग्रेसने केली होती. मुख्यमंत्री विदेशातून जूनच्या अखेरीस परततील असे सांगितले जाते. पण त्याबाबत निश्चित अशी माहिती नाही असे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे. वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांना सोमवारी ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. ते मुंबईच्या कोकिळाबेन इस्पितळात उपचार घेत आहेत. ते अजूनही अतिदक्षता विभागात आहेत. नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे मध्यंतरी अडीच महिने उपचारांसाठी विदेशात राहिले होते. त्यांच्याही आरोग्याविषयी प्रश्न आहेत. ते आता पोर्तुगालच्या दौ-यावर गेले आहेत. सध्या मंत्री विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर, विश्वजित राणे, रोहन खंवटे, माविन गुदिन्हो अशा चार-पाच मंत्र्यांकडूनच सरकार चालविले जात आहे.अन्य मंत्र्यांची कामेही होत नाहीत. ते पर्रीकर कधी परततील हे पाहण्यासाठी थांबले आहेत. पर्रीकर आल्यानंतरच आपली कामे होतील असे दोघा-तिघा मंत्र्यांना वाटते. दरम्यान, जे मंत्री आजारी आहेत, त्या सर्वांना राज्यपालांनी रजा द्यावी जेणेकरून त्यांना लवकर बरे होऊन मग कामावर येता येईल, असे आम आदमी पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स बुधवारी म्हणाले. एखादा सरकारी कर्मचारी आजारी पडल्यानंतर त्यास डॉक्टर रजा व विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. सध्या सरकारमधील आजारी सेवकांनी (मंत्र्यांनी) रजा घ्यावी. ते आजारातून लवकर बरे व्हावे, असे आम्हाला वाटते. त्यांनी त्यांच्याकडील खात्यांचा व कामाचा ताबा दुस-यांकडे द्यावा, असे गोम्स म्हणाले. 

सध्या प्रशासन ठप्पच झाले आहे. सरकार एका बाजूने नोकरभरती बंद करते व दुस-या बाजूने निवृत्त अधिका-यांना सेवावाढ देते. गोमंतकीय युवकांचे भवितव्य सरकार अंधारमय करत आहे, असे गोम्स म्हणाले. एका बिल्डरच्या सेवेसाठी वीज वाहिनी हलवून तिसवाडीला अंधारात ठेवल्याप्रकरणी टीकेचे केंद्र बनलेल्या वीज खात्याचे मुख्य अभियंते एन. रेड्डी यांना निवृत्तीनंतर सेवावाढ देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही गोम्स म्हणाले. 

टॅग्स :goaगोवा