शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चेने नेतृत्व नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 11:53 IST

गोव्यातील काँग्रेसचे चार आमदार फुटून भाजपमध्ये जातील अशा प्रकारची चर्चा पसरल्यानंतर काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व नाराज झाले.

पणजी : गोव्यातील काँग्रेसचे चार आमदार फुटून भाजपमध्ये जातील अशा प्रकारची चर्चा पसरल्यानंतर काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व नाराज झाले. भाजपवाले आपल्या पक्षाच्या आमदारांना पक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकतात, त्याविषयीची शक्यता नाकारता येत नाही, असे काँग्रेसच्या नेतृत्वाला वाटते.गोव्यात काँग्रेस पक्षाचे सरकार अधिकारावर येईल असे काँग्रेसच्या सर्व आमदारांना लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले होते. पणजीत पोटनिवडणूक लढवितानाही काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी वारंवार तशीच घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार अधिकारावर येईल व मग गोव्यातही सत्ता बदल होईल, असे मोन्सेरात यांना वाटले होते. दिगंबर कामत, लुईङिान फालेरो, रवी नाईक, बाबू कवळेकर असे काही नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते पण केंद्रात पुन्हा मोदी सरकारच अधिकारावर आल्याने काँग्रेसच्या आमदारांचा अपेक्षाभंग झाला. आता आमदारांना संघटीत आणि भाजपच्या डावपेचांपासून दूर ठेवण्याचे आव्हान काँग्रेसच्या विधिमंडळ गटाचे नेते कवळेकर यांच्यासमोर आहे.काँग्रेसचे फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक यांना भाजपमध्ये प्रवेश करा असे  निमंत्रण भाजपने दिले असल्याची चर्चा पसरली होती. नाईक यांनी लोकमतशी बोलताना या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगितले. काहीजण उगाच अफवा पसरवून काँग्रेसला बदनाम करू पाहत आहेत, असे नाईक म्हणाले. आपण भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही असे ते म्हणाले.काँग्रेसचे कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार क्लाफास डायस यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकत्र्याशी सल्लामसलत सुरू केल्याची चर्चा वृत्त वाहिन्यांवर रंगली होती. लगेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी डायस यांच्याशी चर्चा केली व वस्तूस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या विधानांचा मिडियाने चुकीचा अर्थ लावला आहे, आपण काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही असे डायस यांनी चोडणकर यांना व पत्रकारांनाही सांगितले. मात्र काँग्रेसचे फ्रान्सिस सिल्वेरा व इजिदोर फर्नाडिस हे दोन आमदार काँग्रेस पक्ष सोडू शकतात अशा प्रकारच्या अफवा वारंवार गोव्यात पसरू लागल्या आहेत.