शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पहाणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते भररात्री रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 17:53 IST

रस्त्यांची पावसाने दुर्दशा उडवली असून त्याची दुरुस्ती योग्यप्रकारे होते की नाही हे पहाण्यासाठीच ते जातीने हजर होते.

 मडगाव - आमदार म्हटले की ती व्यक्ती कुणाला रस्त्यावर हाफ चड्डीत भेटणे मुष्कीलच. मात्र गोव्याचे विरोधी पक्ष नेते असलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत हे भर रात्री हाफ चड्डीत गुरुवारी रात्री मडगावात फिरत होते. त्याचे कारण म्हणजे, मडगावातील रस्त्यांची पावसाने दुर्दशा उडवली असून त्याची दुरुस्ती योग्यप्रकारे होते की नाही हे पहाण्यासाठीच ते जातीने हजर होते.

मागच्या काही दिवसात गोव्यात मुसळधार पाऊस पडल्याने गोव्यात सगळीकडेच रस्ते खराब झाले आहेत. रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी एकूण स्थिती असून अशातच हे खड्डे खडी टाकून काही ठिकाणी बुजविले गेल्याने त्याचा उलटा परिणाम झाला होता. या खड्डय़ातील खडी वा-याने उडू लागल्याने लोकांना धुळ प्रदुषणाला सामोरे जावे लागले होते. गोव्याची आर्थिक राजधानी मानले गेलेल्या मडगावात हा त्रस अधिकच जाणवत होता. त्यामुळे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी रस्ते त्वरित दुरुस्त झाले नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.या इशा-याचा परिणाम म्हणून असेल कदाचित राष्ट्रीय हमरस्ता विभागाने मडगावातील बिघडलेल्या रस्त्यांची डागडुजी युद्धपातळीवर सुरू केली असून, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रस्ते साफ करून पडलेल्या खड्ड्यात कोल्ड मिक्स डांबर घालून ते बुजविण्याचे काम चालू होते. पहाटे 3 वाजेपर्यंत हे काम चालू ठेवले होते.गुरुवारी दुपारी कामत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला इशारा देताना जर रात्रीपासून काम सुरू झाले नाही तर मडगावात रास्ता रोको करुन वाहतूक अडवून धरण्याचा इशारा दिला होता. त्याच्या परिणाम प्रती रात्री 9 वाजता फुटलेल्या रस्त्यावरील पडलेली खडी साफ करण्याचे काम सुरु झाले. रात्री 1 वाजेपर्यंत हे काम कसे चालू आहे हे पहाण्यासाठी आमदार दिगंबर कामत चक्क अर्ध्या चड्डीत रस्त्यावर उभे होते. ओल्ड मार्केट सर्कल ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यापर्यंतची डागडुजी केली गेली असून येत्या तीन दिवसात मडगावातील राष्ट्रीय हमरस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविले जाणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी दिले आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, या कामासाठी दोन वेगवेगळ्या कंत्रटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका कंत्रटदाराने रस्ता साफ करण्याचे काम हाती घेतले असून दुस-या कंत्रटदाराकडून साफ केलेल्या खड्डय़ात कोल्ड मिक्स डांबर घालण्याचे काम चालू आहे. यासाठी सुमारे 50 कामगार कामाला लावले होते. शुक्रवारी सकाळी लोकांना धुळीचा त्रस सहन करावा लागू नये यासाठी रस्त्यावर टँकरने पाण्याची फवारणी करण्यात आली.दरम्यान, या कामावर  शॅडो कौन्सिलचे सावियो कुतिन्हो यांनीही समाधान व्यक्त केले असून, त्यासाठी त्यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना धन्यवाद दिले आहेत. ज्या कंत्रटदारामुळे हे सर्व रस्ते पावसाच्या पाण्यात धुऊन गेले त्यांना काळय़ा यादीत टाकावे अशी मागणी कुतिन्हो यांनी केली असून येत्या चार पाच दिवसात हे काम पूर्ण करावे अशी मागणी केली आहे. मडगावच्या ज्या व्यापा-यांनी शॅडो कौन्सिलला पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतानाच जर हे काम व्यवस्थित झाले नाही तर स्थगित केलेले आंदोलन आम्ही पुन्हा सुरु करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दक्षिण गोव्यात खड्डे बुजविणे सुरूमडगाव ते काणकोण आणि मडगाव ते सांगे या दरम्यानच्या रस्त्याला पडलेले खड्डे काही ठिकाणी रेडिमिक्स काँक्रिट तर काही ठिकाणी कोल्ड मिक्स डांबर घालून बुजविण्यास सुरुवात केली असून, जर पावसाने काही काळ विश्रंती घेतली तर येत्या दोन दिवसांत पूर्ण जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास खात्याला यश येईल, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी व्यक्त केली आहे.शुक्रवारी पावसाने काही प्रमाणात विश्रंती घेतल्याने या कामाला वेग आला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कामगार हे काम जलदगतीने व्हावे यासाठी कार्यरत आहेत. लोकांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहनही पाऊसकर यांनी केले आहे.

टॅग्स :goaगोवा