शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील विरोधी पक्षनेत्याकडे 4.78 कोटींची बेहिशेबी संपत्ती; एसीबीकडून गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 14:57 IST

गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर ऊर्फ चंद्रकांत कवळेकर यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून (एसीबी) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ठळक मुद्देगोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर ऊर्फ चंद्रकांत कवळेकर यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून (एसीबी) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांची व त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांची मिळून एखूण 4.78 कोटी रुपये बेहिशेबी मालमत्ता असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. 

पणजी, दि. 16- गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर ऊर्फ चंद्रकांत कवळेकर यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून (एसीबी) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांची व त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांची मिळून एखूण 4.78 कोटी रुपये बेहिशेबी मालमत्ता असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे.  कवळेकर यांची मालमत्ता  2007 ते 2012 या काळात अनेक पटीने वाढली. त्यांच्या अधिकृत उत्पन्नापेक्षा 59 टक्के मालमत्ता वाढ दाखवित असल्याचे एसीबीचे अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या काळात ते गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते.  काँग्रेस राजवटीत कवळेकर यांनी गैर मार्गाने आणि आपल्या पदचा गैरवापर करून धनलाभ करून घेतल्याचा आरोप करणारी तक्रार एसीबीत देण्यात आली होती. या प्रकरणात प्राथमिक तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश सरकारने एसीबीला दिला होता. 2012 साली तपास सुरू करण्यात आला होता. तो सप्टेंबर 2017 मध्ये पूर्ण झाला. अशा प्रकारचा इतका प्रदीर्घ काळाचा पहिलाच प्राथमिक तपास ठरला आहे.  एसीबीकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात कवळेकर यांची पत्नी सावित्री कवळेकर यांनाही सहसंशयित करण्यात आले आहे. कारण ज्या पाच व्यावसायिक संस्थांमधील मालमत्तेमळे हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्या सर्व पाचही संस्थांच्या सावित्री या संचालक आहेत.