शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

“मागच्या वेळेस दक्षिण गोवा मतदारसंघात अवघ्या मतानी पराभव झाला, यावेळी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार”

By आप्पा बुवा | Updated: April 14, 2023 17:30 IST

उत्साह द्विगुणीत करण्यासाठीच दक्षिण गोव्यात जाहीर सभा होत आहे.  

फोंडा - दक्षिण गोवा लोकसभा मतदार संघात मागच्यावेळी आम्ही अवघ्या मतानी पराभूत झालो. पराभवाचे कारणमिमांसा योग्य वेळी झालेली असून त्या दिवसापासून आम्ही जोरदार काम सुरू केले आहे. गृहमंत्री अमित शहा हे खास दक्षिण गोव्यासाठीच प्रचार सभा घेत असून यावेळी आम्ही  विक्रमी मताधिक्याने दक्षिण गोव्याचे जागा प्रधानमंत्री यांना नक्की देऊ अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी आपला विश्वास व्यक्त केला. दिनांक 16 रोजी गोवा अभियांत्रिकी मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. त्यानिमित्त तिथे चाललेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, माजी आमदार दामू नाईक, भाजपचे खजिनदार संजीव देसाई ,फोंडा भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की 'मागच्या वेळी सुमारे शंभर जागा ह्या अवघ्या मतानी भाजपच्या हातातून निसटल्या होत्या. त्या शंभर जागा व आणखीन 50 अशा 150 जागावर भाजपच्या केंद्रीय समितीने खास लक्ष दिले असून,  दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ सुद्धा अवघ्या मताने आमच्या हातातून निसटला होता. यावेळेस तो मतदार संघ पूर्णपणे बांधून घेण्यात आलेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये पूर्वीपासूनच उत्साह आहे. सदरचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठीच दक्षिण गोव्यात जाहीर सभा होत आहे.  दक्षिण गोव्यातूनच किमान 25000 कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, गोव्यातील सर्व मंत्री, आमदार व भाजपचे नेते ह्या सभेला उपस्थित राहणार आहेत .ठीक चार वाजता सभेस सुरुवात होईल .तर पाच वाजता गृहमंत्री अमित शहा यांचे सभास्थानी आगमन होणार आहे. ह्या प्रचार सभेच्या निमित्ताने सर्व मंत्री आमदार व भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर अमित शहा याची बैठक सुद्धा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

आगामी नगरपालिका निवडणुका संदर्भात बोलताना ते म्हणाले की साखळी व फोंडा दोन्ही नगरपालिका मध्ये भाजपचे स्वतंत्र पॅनल उभे राहणार असून, आम्ही दोन्ही नगरपालिकासाठी चांगले व सक्षम उमेदवार देणार आहोत. दोन्ही नगरपालिकेतील सर्वच्या सर्व नगरसेवक हे भाजपचे असतील याबद्दल शंका नाही. दोन्ही नगरपालिकेवर भाजपचाच झेंडा असेल.

सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना यावेळी मुख्यमंत्री व गोविंद गावडे यांनी महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. वाहतुकीमध्ये बदल सुद्धा सुचवण्यात आले आहेत. लोकांनी मोठ्या संख्येने सदर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत