शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पर्रीकर सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 10:16 IST

गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व मान्य करून सात महिन्यांपूर्वी अधिकारावर आलेल्या सत्ताधारी आघाडीत कुरबुरी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देगोव्यात मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व मान्य करून सात महिन्यांपूर्वी अधिकारावर आलेल्या सत्ताधारी आघाडीत कुरबुरी वाढल्या आहेत. एकाबाजूने भाजप व महाराष्ट्रवादी गोमंतक (मगोप) यांच्यातील दरी रुंदावली आहे तर दुसऱ्याबाजूने गोवा फॉरवर्ड विरूद्ध मगोप असाही वाद रंगू लागला आहे.

पणजी - गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व मान्य करून सात महिन्यांपूर्वी अधिकारावर आलेल्या सत्ताधारी आघाडीत कुरबुरी वाढल्या आहेत. एकाबाजूने भाजप व महाराष्ट्रवादी गोमंतक (मगोप) यांच्यातील दरी रुंदावली आहे तर दुसऱ्याबाजूने गोवा फॉरवर्ड विरूद्ध मगोप असाही वाद रंगू लागला आहे.

गेल्या मार्च महिन्यात गोवा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यावेळी भाजपाला फक्त तेरा जागा मिळाल्या होत्या. उलट काँग्रेसला सतरा जागा प्राप्त झाल्या होत्या पण पर्रीकर हे जर गोव्यात नेतृत्व करण्यासाठी येत असतील तर आम्ही भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास तयार आहोत असे मगोप आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांनी त्यावेळी जाहीर केले व त्यानंतर लगेच पर्रीकर यांनी गोव्यात सरकार स्थापन केले. मात्र आता सात महिने सरकारला होताच मगोपने आपल्या मनातील नाराजी जाहीरपणे मांडली व सरकारला काही कडक प्रश्न विचारले. मगोपला पर्रीकर सरकारमध्ये योग्य ती वागणूक मिळत नाही अशी तक्रार माजी आमदार लवू मामलेदार यांनी व्यक्त केली. मंत्री विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सरकारने विविध महामंडळांवर पदे दिली पण मगोपला मात्र तसे काही मिळालेले नाही असे मगोपच्या काही पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे सांगणे सुरू केले आहे. याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अजून भाष्य केलेले नाही पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष मंत्री सरदेसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मगोपने जाहीरपणे नाराजी व्यक्त न करता मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा विषय मांडावा असे तेंडुलकर यांनी म्हटले आहे. मंत्री सरदेसाई यांनी काहीशी उपहासात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गोव्यातील सत्ताधारी आघाडी सरकारचे आपण शिल्पकार असून मगोपसाठी काही सरकारी जागांचा त्याग करण्यास गोवा फॉरवर्ड तयार आहे असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. मात्र मगोपच्या नेत्यांचे समाधान झालेले नाही.दरम्यान गोवा सरकार आता मंत्री सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्डच्या आग्रहाखातरच एक स्वतंत्र नियोजन व विकास प्राधिकरण स्थापन करत असल्यानेही भाजपचे काही आमदार व मंत्री कुरबुरी करू लागले आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर हे गोवा फॉरवर्डच्याच कलाने सरकार चालवू पाहतात अशी खंत भाजपाचे काही आमदार व मंत्र्यांनी पत्रकारांकडे बोलताना व्यक्त केली आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर