फोंडा : कुर्टी-फोंडा येथील क्रीडा संक्रलात गोवा सरकारच्या युवा व क्रीडा व्यवहार संचालनालयातर्फे आयोजित अखिल गोवा आंतर उच्च माध्यमिक विद्यालयीन बेसबॉल स्पर्धेत कुर्टी फोंडा येथील श्री कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.अंतिम सामन्यात कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाला शिरोडा येथील शिवग्राम उच्च माध्यमिक विद्यालयाकडून ८ विरूध्द ६ असा निसटता पराभव स्विकारावा लागला. कामाक्षीतर्फे सोनाली बोरकर, तिमिया गावडे, कल्पिता नाईक, उमा नाईक, साईस्था सय्यद, प्रतिक्षा मोरजकर, वनिता गावडे, अमिता प्रियोळकर, चैताली गावडे, सोनम नाईक, संतोषी सावंत, समिक्षा वेळीप, अलिशा नाईक यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवले. मात्र त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. संघाला मुख्र्य प्रशिक्षक प्रा. लुईस वाझ तसेच प्रा. नामदेव नाईक, सुरेखा नाईक, माधवी नाईक इत्यादींचे मार्गदर्शन लाभले. कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष विनायक नाईक, व्यवस्थापक उमेश शिरोडकर, प्राचार्य परमेश्वर भट यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)
बेसबॉल स्पर्धेत कामाक्षी उच्च माध्यमिकच्या मुलींचे यश
By admin | Updated: May 3, 2014 14:25 IST