शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

गोव्यातील कोलवा बीच आता होणार ‘आदर्श पर्यटन स्थळ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 17:31 IST

पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित मानला गेलेला  आणि आपल्या रुपेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील कोलवा समुद्र किना-याचा आता ‘आदर्श पर्यटनस्थळ’ म्हणून विकास केला जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ताजमहाल, काझीरंगा आणि सोमनाथ मंदिराच्या बरोबरीने आता कोलव्याचाही विकास केला जाणार आहे.

-  सुशांत कुंकळयेकर

मडगाव :  पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित मानला गेलेला  आणि आपल्या रुपेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील कोलवा समुद्र किना-याचा आता ‘आदर्श पर्यटनस्थळ’ म्हणून विकास केला जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ताजमहाल, काझीरंगा आणि सोमनाथ मंदिराच्या बरोबरीने आता कोलव्याचाही विकास केला जाणार आहे.मडगावपासून अवघ्या सात कि.मी. अंतरावर असलेला हा समुद्र किनारा आपल्या निळ्याभोर पाण्यासाठी आणि तटावर असलेल्या पांढ:याशुभ्र वाळूसाठी प्रसिद्ध आहे. या किना:याची खासियत म्हणजे, या रुपेरी वाळूत कुठेही खडकाळ जागा आड येत नाही त्यामुळे देशी व विदेशी पर्यटकांच्या पसंतीचा किनारा म्हणून तो प्रसिद्ध आहे. या किना:याची महती संपूर्ण जगात पोहोचली आहे.सध्या नवी दिल्लीत चालू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय पर्यटनमंत्री के.एस. आफोन्स यांनी लोकसभेत सोमवारी ही माहिती दिली. यासाठी चालू अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूदही केल्याचे सांगण्यात आले. पर्यटन स्थळांची आणखी विकसित करण्याची क्षमता, सोप्यारितीने विकास कार्यक्रम पूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा विकास हाती घेण्याचे ठरविले आहे. यातील आणखी एक मुद्दा म्हणजे, फुटबॉलचे आकर्षण हाही आहे.आदर्श पर्यटनस्थळ कार्यक्रमाखाली उत्तर प्रदेशातील ताजमहाल आणि फतेहपूर सिक्री, महाराष्ट्रातील अजंठा आणि एलोरा, नवी दिल्लीतील हुमायूची कबर, कुतूबमिनार व लाल किल्ला आणि गोव्यातील कोलवा बीचचा समावेश आहे.केंद्राकडून लक्ष केंद्रीत करण्यात आलेले इतर पर्यटन स्थळांमध्ये राजस्थानचा अमेर किल्ला, गुजरातमधील सोमनाथ व धोलवारिया, मध्यप्रदेशमधील खजुराहो, कर्नाटकामधील हंपी, तामीळनाडूमधील महाबळीपुरम, आसाममधील काझीरंगा, केरळमधील कुमारकोम व बिहारमधील महाबोधी मंदिराचा समावेश आहे. सध्या पर्यटन मंत्रलयातर्फे हाती घेतलेल्या स्वदेश दर्शन या योजनेखाली हा विकास केला जाणार आहे.आदर्श पर्यटनस्थळ या योजनेखाली वरील स्थळांचा साधनसुविधाच्या दृष्टीतून विकास करण्याबरोबरच या स्थळांचे ब्रँडींग व मार्केटींग हाती घेण्यात येणार आहे. या योजनेत खासगी गुंतवणूकदारांना समाविष्ट केला जाईल असे आफोन्स यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :goaगोवा