शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात शनिवारपासून किंग मोमोची राजवट, युद्ध नसल्याने कार्निव्हलला आक्षेप नाही : भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 21:09 IST

गोव्यात उद्या शनिवारपासून तीन दिवस किंग मोमोची राजवट असेल. खा, प्या आणि मजा करा असा संदेश देणारा कार्निव्हल  उद्या शनिवारपासून सुरू होत आहे.

पणजी : गोव्यात उद्या शनिवारपासून तीन दिवस किंग मोमोची राजवट असेल. खा, प्या आणि मजा करा असा संदेश देणारा कार्निव्हल  उद्या शनिवारपासून सुरू होत आहे. तथापि, देशातील सध्याची स्थिती पाहता कार्निव्हल किंवा वाईन महोत्सव सरकारने साजरा करणे किती योग्य असे पत्रकारांनी भाजपाच्या नेत्यांना विचारले असता, सध्या भारत-पाक युद्ध होत असल्याने कार्निव्हलसारखे महोत्सव साजरे करण्यामध्ये काही गैर नाही, असे त्यांनी सांगितले.पणजी शहरात शनिवारी कार्निव्हलची मिरवणूक होईल. मिरामार सर्कल ते दोन पावलांपर्यंत कार्निव्हलनिमित्त सायंकाळी साडेतीन ते चारच्या सुमारास चित्ररथ मिरवणूक होईल. मग सलग तीन-चार दिवस अन्य शहरांमध्ये कार्निव्हलच्या मिरवणुका होतील. संपूर्ण देश पुलवामामध्ये गमावलेल्या 40 जवानांच्या शोकसागरात आणि सीमेवरील तणावाच्या वातावरणात असताना गोव्यात मात्र पर्यटनाच्या नावाखाली खा, प्या आणि मजा करा या संदेशाचे चाळे चालवू देणा-या गोवा सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.भाजपचे नेते व वीजमंत्री निलेश काब्राल यांना पत्रकारांनी याविषयी विचारले असता, काब्राल म्हणाले की कार्निव्हल वगैरे उत्सव म्हणजे सांस्कृतिक उपक्रम आहेत. भारत-पाक युद्ध जर आता असते तर आम्हालाही असे सगळे उपक्रम थांबविणे योग्य वाटले असते. मात्र देशात सध्या युद्धाची स्थिती नाही. त्यामुळे आम्ही उपक्रम थांबविण्याचे कारण नाही. देशात अनेक सोहळे सध्या सुरू आहेत. त्यात काही गैर नाही. विरोधकांकडून ज्या भावना व्यक्त केल्या जातात, त्या भावना काही सर्व लोकांच्या नव्हे. भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यावेळी म्हणाले, की केंद्र सरकार दहशतवादाचा बिमोड करील. देशातील सगळे व्यवहार ठप्प व्हावेत असा दहशतवाद्यांचा हेतू असतो. आम्ही तो हेतू साध्य होऊ देत नाही.