शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

म्हापसा नगरपालिकेच्या बैठकीत खडाजंगी; वाद नियंत्रणात येत नसल्याने बैठक सोडण्याचेही आदेश

By काशिराम म्हांबरे | Updated: November 22, 2023 18:29 IST

नगराध्यक्षांनी एका नगरसेवकाला बैठक सोडून जाण्याची सूचना केली होती

म्हापसा, काशिराम म्हांबरे: नगराध्यक्षा तसेच नगरसेवकातील खडाजंगीत संपन्न झालेल्या म्हापसा नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत हंगामी कामगारांच्या पगार वाढिच्या मुद्यासोबत औद्योगीत वसाहतीतील कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. मागील आठवड्यात बैठकीच्या नोटिशीच्या मुद्यावरून स्थगित ठेवण्यात आलेली नगरपालिकेची बैठक आज बुधवारी पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बैठकीच्या पटालावर असलेल्या विविध मुद्यावरील चर्चेदरम्यान नगरसेवक तसेच नगराध्यक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याने बऱ्याच वेळी शाब्दिक वाद होताना दिसून आले. होत असलेले वाद विकोपालाही जात होते. वादावर नियंत्रणात येत नसल्याने नगराध्यक्षांनी एका नगरसेवकाला  बैठक सोडून जाण्याची सुचनाही केली होती.

पालिकेतील विविध पदावर  हंगामी सेवा पुरवणाऱ्या सुमारे १२२ कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर निर्णय घेताना कर्मचाऱ्यांनी नागरिकांना तसेच नगरसेवकांनी चांगली सेवा पुरवावी असेही नगरसेवकांकडून सुचीत करण्यात आले. थिवी औद्योगीक वसाहतीतून गोळा होणाऱ्या कचऱ्यावर लागू करण्यात आलेल्या करावर फेरविचार व्हावा असे प्रस्ताव तेथील समितीने पालिकेला पाठवला होता. लागू करण्यात आलेला कर लहान कंपन्यांवर अन्यायकारक असल्याने फेरविचाराची मागणी करण्यात आलेली.  या औद्योगिक वसाहतीचा पालिकेला थेट लाभ होत नसल्याने प्रस्तावावर पुढील बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या दरम्यान पालीका तसेच तेथील मंडळात चर्चा केली जाणार आहे.

टॅग्स :goaगोवा