शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

कारवारचे आमदार सतीश सैल यांची गोव्यात खाण घोटाळा प्रकरणात तब्बल दोन तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 19:27 IST

खाण घोटाळा प्रकरणात कारवारचे आमदार सतीश सैल यांनी आज दुपारी येथील पोलिसांच्या विशेष तपास अधिकाऱ्यांसमोर (एसआयटी) हजेरी लावली.

पणजी : खाण घोटाळा प्रकरणात कारवारचे आमदार सतीश सैल यांनी आज दुपारी येथील पोलिसांच्या विशेष तपास अधिकाऱ्यांसमोर (एसआयटी) हजेरी लावली. तब्बल दोन तास त्यांची चौकशी झाली. त्याआधी सकाळी येथील सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. दुपारी ४ वाजता आणि त्यानंतर पोलिसांना आवश्यकता भासेल तेव्हा चौकशीला हजर राहण्याची अट त्याना घालण्यात आली आहे. सकाळी सैल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणीसाठी आला असता पोलिसांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेतली. त्यानंतर न्यायालयाने सैल यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. दुपारी ४ वाजता सैल हे रायबंदर येथील एसआयटी अधिकाºयांसमोर दाखल झाले. निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी पोलिस अधिक्षक कार्तिक कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची तब्बल दोन तास चौकशी केली. सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांना जाऊ देण्यात आले. या आमदाराचा खाण घोटाळ्याशी प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे एसआयटीला मिळाले आहेत. विशेषत: खनिज निर्यात प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे. एसआयटीने याआधी अटक केलेल्या काही ट्रेडर्समुळे सैल यांचा या खाण घोटाळ्यातील सहभाग उघड झाला आहे. या ट्रेडर्सकडून त्यांनी चोरीचा खनिजमाल विकत घेतल्याचा संशय आहे. सैल हे कारवारचे अपक्ष आमदार असून त्यांचा सदाशिवगड येथे बंगला आहेव कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. सैल हे मल्लिकार्जुन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड या निर्यातदार कंपनीचे संचालक आहेत. गोव्यातून बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात आलेले लोह खनिजमाल ट्रेडर्सद्वारे या कंपनीला पुरविला जात होता. या कंपनीकडून त्याची नंतर निर्यात केली जात होती. खाण घोटाळ्यातील संशयित ट्रेडर्सच्या नोंदवहीत मल्लिकार्जुन शिपिंगचा उल्लेख आढळला आहे. २00७ ते २0१२ या काळात गोव्यात झालेला बहुतांश खनिजोद्योग हा बेकायदेशीर होता; लिजांचे नूतनीकरण न करताच खाणींतून खनिजाचे बेकायदा उत्खनन खाण उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर चालू ठेवले. कोट्यवधी रुपयांचे खनिज सरकारला रॉयल्टीही न देता निर्यात करण्यात आले होते. या प्रकरणात चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या एम. बी. शहा आयोगाने नंतर तब्बल ३५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला होता. दरम्यान, बेल्लारी खाण घोटाळ्यातही सैल यांचा सहभाग असल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने याआधी ठेवला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयकडून त्यासाठी त्याला अटकही केली होती.