शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कर्नाटकनंतर गोव्यातही घडामोडी शक्य, दहा काँग्रेस आमदार भाजपच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 18:22 IST

कर्नाटकमधील काँग्रेसच्या फुटीचे नाट्य गाजत असतानाच आता गोव्यातही काँग्रेस पक्ष फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पणजी : कर्नाटकमधील काँग्रेसच्या फुटीचे नाट्य गाजत असतानाच आता गोव्यातही काँग्रेस पक्ष फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे दहा आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. काँग्रेसच्या आमदारांमध्ये कधीही फुट पडू शकते अशी स्थिती बुधवारी सायंकाळी आली आहे.काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेसकडे एकूण पंधरा आमदारांचे संख्याबळ आहे. काँग्रेसचे दहा आमदार पक्षातून बाहेर आले तर मग त्यांना आमदारकीचे राजीनामे देण्याची गरज पडणार नाही. दहा आमदारांचा गट भाजपामध्ये विलीन करावा, असाही विचार काँग्रेसच्या आमदारांनी चालवला आहे. भाजपाचे गोवा प्रभारी बी. एल. संतोष हे गेले दोन दिवस गोव्यात आहेत. प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व रवी नाईक असे पाच आमदार वगळता अन्य दहाही आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्यास तयार झाले असल्याची माहिती मिळते. भाजपाच्या कोअर टीमचीही स्वतंत्रपणे बैठक पार पडली. त्यावेळी काँग्रेसच्या दहा आमदारांच्या नियोजित रणनीतीविषयी चर्चा झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपप्रणीत आघाडीचे सरकार अधिकारावर आहे, पण घटक पक्ष व अपक्षांचे दबावाचे राजकारण भाजपाला नको आहे. भाजपाचे स्वत:चे 17 आमदार आहेत. मगो पक्षातून दोन आणि काँग्रेसमधून तिघांना आणून भाजपने आमदारांची संख्या सतरापर्यंत नेली. मात्र बहुमतासाठी एकवीस आमदारांचे संख्याबळ गरजेचे असते. विद्यमान आघाडी सरकारमध्ये गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन आणि अपक्ष दोघे आमदार आहेत. हे पाचही बिगरभाजप नेते मंत्रिमंडळात आहेत. आघाडी सरकारमध्ये अधूनमधून अनेक कुरबुरी सुरू असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील दहा आमदारांना काँग्रेसपासून वेगळे करावे असे ठरले. काँग्रेसकडे मग पाचच आमदार उरतील व विरोधी पक्ष म्हणून या पक्षाचे बळही नगण्य होईल.

टॅग्स :goaगोवा