शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाई उद्ध्वस्त होतेय, गावाने नाकारला परवाना; म्हणाले, झुकेगा नहीं साला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 08:04 IST

कंडोलिमचा बाणेदारपणा : कॅसिनो बेकायदेशीरच, पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही स्थितीत कॅसिनोला परवानगी देणार नाही असं गावानं ठामपणे सांगितले.

नरेश डोंगरे / आशिष रॉय

पणजी (गोवा) : कॅसिनो बेकायदेशीर आहे आणि कॅसिनोमुळे तरुणाई उद्ध्वस्त होत असल्याचे लक्षात आल्यामुळे कंदोली (कंडोलिम) या छोट्याशा गावातील गावकऱ्यांनी आपला बाणेदारपणा दाखवला. त्यांनी जोरदार विरोध करून कॅसिनोचा वाणिज्य परवाना नाकारला. एवढेच नव्हे तर या गावात लावलेले कॅसिनोचे डिस्प्ले बोर्डही उखडून फेकले. 

पणजीजवळ कंदोली हे छोटेसे सुंदर गाव आहे. येथील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करणारा. हे गाव कमालीचे स्वाभिमानी. या ग्रामपंचायतीकडे ग्रँड- ७ कॅसिनोने व्यापारासाठी परवानगी मागितली होती. मात्र, येथे कॅसिनो सुरू झाल्यास गावातील तसेच आजूबाजूचे तरुण उद्ध्वस्त होतील, हा धोका लक्षात घेऊन कॅसिनोला गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला. परवानगीही नाकारली. सरपंच अनासितो फर्नांडिस यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही स्थितीत कॅसिनोला परवानगी देणार नाही. 

झुकेगा नहीं साला...आमच्या गावात कॅसिनोने ५८ डिस्प्ले बोर्ड लावले होते. आम्ही ते  काढून टाकले.  कॅसिनो व्यवस्थापनापुढे किंवा कोणत्याही दबावापुढे ‘झुकेगा नहीं साला...’ असेही फर्नांडिस यानी ठणकावून सांगितले.

सरकारला आपल्याच लोकांची काळजी नाही कॅसिनो सुरू झाल्यापासून जुगाराचे व्यसन जडलेल्यांची वाढती संख्या आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात घेता गृह विभागाने कॅसिनोत स्थानिकांना प्रवेश देऊ नये, असा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, असा आरोप गोवेकर करतात. आपल्याच राज्यातील नागरिकांची सरकारला काळजी नाही, असाही उद्वेग ही मंडळी व्यक्त करतात.

अनेक जण झाले बरबाद म्हणून...बहुताश राज्यांनी कॅसिनोला परवानी दिलेली नाही. कॅसिनोमुळे अनेकजण बरबाद झाले आहेत. त्यामुळे कॅसिनोवर संपूर्ण देशात बंदी घालायला हवी, असे परखड मत फर्नांडिस यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या मेरी डिकोस्टा म्हणाल्या, तरुणांनी कॅसिनोच्या नादी लागून संपत्ती गमावली. यामुळे स्त्रियांची कोंडी झाली. ही स्थिती कुणाला सांगूही शकत नाही. गोव्यात अशी अनेक कुटुंब असल्याचे त्या म्हणाल्या.