शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

कामत यांची सव्वादोन तास चौकशी, ४0 खाण लिजांना विलंबाची माफी दिल्यावरुन केले अनेक सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 20:14 IST

खाण घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा मडगांवचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांची शुक्रवारी एसआयटी पोलिसांनी सुमारे सव्वा दोन तास चौकशी केली.

पणजी : खाण घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा मडगांवचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांची शुक्रवारी एसआयटी पोलिसांनी सुमारे सव्वा दोन तास चौकशी केली. खाण उद्योजक प्रफुल्ल हेदे यांच्या कुळे येथील खाण लिजाच्या बाबतीत तसेच अन्य मिळून ४0 खाण लिजांना दिलेली विलंबाची माफी यासंबंधी पोलिसानी कामत यांना अनेक प्रश्न विचारले. 

शुक्रवारी सकाळी ११.१0 च्या सुमारास कामत एसआयटीचे पोलिस निरीक्षक उदय नाईक यांच्यासमोर हजर झाले. दुपारी १.३0 वाजेपर्यंत त्यांची चौकशी चालली. कामत हे २00७ ते २0१२ या काळात मुख्यमंत्री होते. या काळात खाण खातेही त्यांच्याकडेच होते. खात्याचे माजी सचिव राजीव यदुवंशी यांनी न्यायदंडाधिकाºयासमोर दिलेल्या जबानीत कामत यांनी आपली दिशाभूल करुन हे काम करुन घेतल्याची जबानी देऊन कामत यांच्यावरच खापर फोडल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी कामत यांच्यावर लक्ष केंद्रित केले. येथील विशेष न्यायालयाकडून त्यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मिळालेला असून पुढील सुनावणी येत्या सोमवार २७ रोजी आहे. पोलिसांना सोमवारपर्यंत आपल्याला म्हणणे मांडावे लागेल. कामत यांची चौकशीसाठी कोठडीत गरज आहे की नाही, हे स्पष्ट करावे लागेल. 

यदुवंशी यांनी कामत यांच्यावर खापर फोडल्यानंतर पोलिसांनी कामत यांच्या नातेवाईकांनाही समन्स काढले. त्यांचे पुत्र योगिराज कामत तसेच मेहुणे सतीश लवंदे यांचीही चौकशी करण्यात आली. लवंदे संचालक असलेल्या गणेश इन्फ्रा कंपनीचे व्यवहार संशयास्पद वाटल्याने तसेच या कंपनीचे खाण घोटाळ्याशी संबंध असल्याच्या संशयावरुन चौकशी करण्यात आली. 

कामत यांना गेल्या मंगळवारी पोलिसांनी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स काढले होते. परंतु प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन ते आले नव्हते. शुक्रवारी ते दाखल झाले. या प्रकरणी खाण उद्योजक प्रफुल्ल हेदे यांना समन्स काढून येत्या मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. कामत यांच्या जामीन अर्जाबाबत  सोमवारपर्यंत न्यायालयात म्हणणे मांडायचे असल्याने पोलिस आता या कामात व्यस्त आहेत.