शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कला अकादमीचे १० रोजी उद्घाटन, इफ्फिसाठी सज्ज

By समीर नाईक | Updated: November 6, 2023 16:35 IST

सोमवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली. यावेळी कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, सदस्य सचिव विनेश आर्लेकर उपस्थित होते. 

पणजी : मागील दोन वर्षापासून खुली होण्याकरिता बहुप्रतिक्षेत असलेली कला अकादमी येत्या दि १० रोजी जनतेसाठी, कलाप्रेमीसाठी खुली होणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. 

सोमवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली. यावेळी कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, सदस्य सचिव विनेश आर्लेकर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री डाॅ प्रमोद सावंत यांच्याहस्ते नूतन कला अकादमीचे उद्घाटन स. १०वा. होणार आहे. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, महसूल मंत्री व पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, मुख्य सचिव पुनीत गोयल, कला व संस्कृती सचिव मिनिनो डिसोझा आयएएस, उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर हा सोहळा झाल्यानंतर सायं. ७ वा सिद्धीनंदन थिएटर नागेशी फोंडा प्रस्तुत प्रा. वसंत कानेटकर लिखित ऐतिहासिक नाटक इथे ओशाळला मृत्यु नाटक सादर होणार आहे, असे गावडे यांनी यावेळी सांगितले. 

 इफ्फीसाठी कला अकादमी सज्ज मागील तीन वर्षे कला अकादमीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते, ते आता जवळपास पूर्णत्वाला आले आहे. कला अकादमीचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल हाती आला तेव्हापासून कला अकादमीचे काम जलदगतीने सुरू केले. कला अकादमीचे उद्घाटन झाल्यानंतर दि. २० रोजीपासून गोव्यात होणाऱ्या इफ्फीसाठी कला अकादमी वापरण्यात येईल, असे गावडे यांनी सांगितले. उच्च दर्जाच्या सुविधा कला अकादमीचा मुख्य सभागृह, ब्लॅक बॉक्स, आर्ट गॅलरी, ज्युरी रूम, मीटींग रूम, भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीताचे वर्गा सारखी साधनसुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. सभागृहातील साऊंड व्यवस्था, स्टेज काफ्ट लाईट्स, एसी यंत्रणा ही नवीन बसविण्यात आली आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीताचे वर्ग जे यांची क्षमता वाढविण्यात आली आहेत. फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिरात घेण्यात येत असलेल्या थिएटर कॉलेज ऑफ पर्फमिन्स दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विचार केला जात आहे. परंतु नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत थिएटर कॉलेज राजीव गांधी कलामंदिरात सुरू राहील. त्यानंतर हळुहळु वर्षभराचे कला अकादमीचे कार्यक्रम सुरू होतील. अशी माहिती मंत्री गावडे यांनी दिली. 

 ओपन ओडिटोरियमच्या कामाला वेळ लागणार कला अकादमीचे ओपन ओडिटोरियमचे छत हल्लीच कोसळले होते, पावसामुळे हे काम करण्यात व्यत्यय येत आहे, त्यामुळे ओपन ओडिटोरियमचे काम अजूनपर्यंत सुरू करण्यात आले नाही. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो, असेही गावडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :IFFIइफ्फीgoaगोवा