शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

'सिंदूर'द्वारे पाकला अद्दल: मुख्यमंत्री सावंत; पर्वरीत तिरंगा यात्रा, सैनिकांच्या धाडसी कारवाईचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:53 IST

माजी मुख्यमंत्री तथा देशाचे संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी खरेदी केलेल्या एस-४०० या शस्त्र आयुधांद्वारे विशेष कामगिरी केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो.

लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्याबद्दल त्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंदूर ऑपरेशनद्वारे पाकिस्तान हद्दीत थेट घुसून दहशतवाद्यांचे तळ हवाई हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केले. आमच्या सैनिकांनी, नौदल आणि हवाईदलाने संयुक्त कारवाई करून कामगिरी यशस्वी केली. आमची शूर सेना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. सिंदूर ऑपरेशन चालू राहणार असून पंतप्रधानांना पाठिंबा राहील, असे उद्‌गार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढले.

पर्वरी मतदारसंघात मंगळवारी (दि.१३) मंत्री रोहन खंवटे आणि नागरिकांनी आयोजित केलेल्या सिंदूर तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री सावंत सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, जि.पं. सदस्य कविता नाईक, सरपंच स्वप्नील चोडणकर, सोनिया पेडणेकर, पर्वरी भाजप मंडळाचे अध्यक्ष विनीत परब, तिन्ही पंचायतीचे पंच सदस्य आणि शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

खंवटेंनी काढली पर्रीकरांची आठवण

मंत्री रोहन खंवटे यांनी आपल्या भाषणात पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. आमच्या जवानांनी पाकिस्तानला धडा शिकवला असून पंतप्रधान मोदी यांच्या सिंदूर ऑपरेशनद्वारे दहशतवाद्यांचा खात्मा केला. माजी मुख्यमंत्री तथा देशाचे संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी खरेदी केलेल्या एस-४०० या शस्त्र आयुधांद्वारे विशेष कामगिरी केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. पंतप्रधान मोदी यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असेही मंत्री खंवटे म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPramod Sawantप्रमोद सावंत